मूसेवालाने गाण्यांमधून भडकवले म्हणून त्याला मारले, पोलीस तपासात बिश्नोईचा खुलासा

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने नवे कारण सांगितले आहे. लॉरेन्सने सागितलेकी मूसेवाला त्याच्या गाण्यांमधून आपल्याला भडकवत असे. गाण्यांमध्ये शस्त्रे दाखवत तो आव्हान देत असे, म्हणून आम्ही त्याला मारले.

musewala

सिद्धू मुसेवालाची हत्या का झाली, यावरून लॉरेन्स बिश्नोई यांनी हळूहळू पडदा उचलण्यास सुरुवात केला आहे. सध्या सुरू असलेल्या चौकशीत जे समोर आले आहे, त्याशिवाय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने नवे कारण सांगितले आहे. लॉरेन्सने सागितलेकी मूसेवाला त्याच्या गाण्यांमधून आपल्याला भडकवत असे. गाण्यांमध्ये शस्त्रे दाखवत तो आव्हान देत असे, म्हणून आम्ही त्याला मारले.

पोलीस तपास वेगळ्या दिशेने-

लॉरेन्स बिश्नोईच्या नव्या खुलाशानंतर पोलीस तपास वेगळ्या दिशेने वळला आहे. 29 मे रोजी पंजाबमधील मानसाजवळ मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांची नावे समोर आली आहेत.

चौकशीत नवे खुलासे –

सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिसांनी दिल्लीहून चौकशीसाठी आणले होते. याआधी लॉरेन्स बिश्नोई सतत म्हणत होते की मोहालीतील विक्की मिड्डूखेड़ाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीने मूसेवालाची हत्या केली. मिड्डूखेड़ा हा लॉरेन्सचा कॉलेज मित्र होता. मात्र, आता त्याने हत्येमागे नवे कारण सांगितले आहे.

कोणाला सुपारी दिली नाही : बिष्णोई –

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने मुसेवाला यांच्या हत्येसाठी कोणालाही सुपारी दिली नसल्याचेही म्हटले आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येची सुपारी मुसेवालाला देण्यापूर्वी बिश्नोईने दिल्लीचा गुंड हाशिमला या कामासाठी नेमले होते, असे आतापर्यंत बोलले जात होते. त्याच्यासोबत गँगस्टर हाशिमही दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद होता. मग हाशिमने हत्येचे हे काम शाहरुखवर सोपवले, पण कडेकोट बंदोबस्तामुळे तो कोणतीही घटना घडवू शकला नाही. मात्र ,आता या गुंडाने पुन्हा एकदा या गोष्टीचा इन्कार केला आहे.

काय म्हणाला होता लॉरेन्स बिश्नोई –

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मोठा खुलासा केला होता. दिल्ली पोलिसांनी चौकशी केली असता लॉरेन्स बिश्नोईने आमच्या टोळीतील एका सदस्याने मूसावालाची हत्या केली आहे. यासोबतच बिश्नोई म्हणाला होता की, विकी मिड्दुखेडा कॉलेजच्या काळापासून माझा मोठा भाऊ होता, त्यामुळे आमच्या ग्रुपने त्याच्या मृत्यूचा बदला घेतला आहे