Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Bitcoin ला 'या' देशाने दिली कायदेशीर मान्यता

Bitcoin ला ‘या’ देशाने दिली कायदेशीर मान्यता

आभासी चलनाला कायदेशीररित्या परवानगी देणारा अल् साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला

Related Story

- Advertisement -

जगभरात प्रसिद्ध असलेल्या बिटकॉइन (Bitcoin) या आभासी चलनात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण पहायला मिळत आहे. मे महिन्यातही बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले. सध्या बिटकॉइनचा भाव १३००० डॉलर इतका झाला आहे. आता बिटकॉईन या आभासी चलनाला अमेरिकेतील अल् साल्वाडोर या देशाने कायदेशीररित्या मान्यता दिली आहे. (Bitcoin is legally recognized by El Salvador American country)  आभासी चलनाला कायदेशीररित्या परवानगी देणारा अल् साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला आहे. साल्वाडोरच्या संसदेने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव ६२च्या तुलनेच ८४ मतांनी मंजूर केला आहे. बिटकॉईनमुळे साल्वाडोर देशात आर्थिक गुंतवणूक,पर्यटन,नाविन्य आणि आर्थिक वाढ होईल असे साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी म्हटले आहे.

साल्वाडोर देशाने बिटकॉनईला मान्यता दिल्यानंतर बिटकॉईनमध्ये १३.६० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायाला मिळाले. सध्या बिटकॉईनची किंमत ३७१८२.४९ डॉलर इतकी आहे. मे महिन्यात बिटकॉईनमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी बिटकॉईनकडे पाठ फिरवली होती. चीनने देखिल अशाप्रकारच्या आभासी चलनाबाबत कडक धोरणे लागू केली आहेत. सध्या सर्व आभासी चलने सावरली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बिटकॉईन आभासी चलन वगळता इतर आभासी चलनात ५.२७ टक्के वाढ झालीय. त्यांच्या किंमती सध्या २५६६.४० डॉलर इतक्या झाल्या आहेत. तर Binance Coin या चलनात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.

बिटकॉईन म्हणजे काय?

- Advertisement -

बिटकॉईन हे एक आभासी चलन आहे. ज्याला क्रिप्टो करन्सी असेही म्हटले जाते. २००९मध्ये बिटकॉईन हे आभासी चलन संपूर्ण जगासमोर आले. हे ओपन सोर्स प्रोटोकॉलवर आधारित आहे. बिटकॉईन कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणाद्वारे जारी करण्यात आलेले नाही.


हेही वाचा – Faceboookच्या पहिल्या वहिल्या स्मार्टवॉचच्या लाँचिंगचा झाला खुलासा; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -