घरCORONA UPDATEखुशखबर! सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे भाव!

खुशखबर! सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे भाव!

Subscribe

गुरुवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम २७४ रुपयांची घसरण झाली आहे. यासह गुरुवारी दिल्लीतील सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ४७,१८५ रुपयांवर बंद झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी दिल्लीत सोन्याचे भाव प्रति १०  ग्रॅम ४७,४५९ रुपयांवर बंद झाले आहेत.

देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये सोन्यासह चांदीचे दरही खाली घसरले आहेत. गुरुवारी चांदीच्या भावात ५४२ रुपयांनी घट झाली आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ४९,५५८ रुपयांवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी चांदी ५०,१०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की, गुरुवारी दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याचे स्पॉट दर देखील १० ग्रॅम प्रति २७४ रुपयांनी खाली घसरत आहेत. ते म्हणाले की, जागतिक सोन्याच्या किंमतीतील घसरणीनंतर देशांतर्गत बाजारात किंमत खाली आली आहे.

- Advertisement -

रिटेल ज्वेलरी स्टोअरसुद्धा भारतात हळूहळू सुरू होत असल्याची माहिती पटेल यांनी दिली. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे बर्‍याच दिवसांपासून बंद राहिल्यानंतर देशांतर्गत सराफा बाजार सोमवारी राजधानीत पुन्हा सुरू झाला. कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशभरात बंदी घातल्यामुळे सराफा बाजार बंद होते. लॉकडाऊन ५ मध्ये अनेक नियम  शिथिल करण्यात आले आहेत.


हे ही वाचा – ‘लव्ह- सेक्स’ चॅट करत महिलेने २ तरूणांना ओढलं आपल्या जाळ्यात आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -