घरCORONA UPDATECoronavirus : रोजगार बुडाल्यास 'ही' सरकारी बँक देणार ५ हजार रुपये कर्ज

Coronavirus : रोजगार बुडाल्यास ‘ही’ सरकारी बँक देणार ५ हजार रुपये कर्ज

Subscribe

कोरोना संकटात रोजगार बुडाल्यास सरकारी बँक ५ हजार रुपये कर्ज देणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देश २१ दिवस लॉकडाऊन केला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होत असून देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. तसेच उद्योगधंदे बंद असल्याने कंपन्या पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहेत. अशावेळी घरखर्च कसा चालवायचा? या प्रश्नांनी ग्रामीण भागातील अनेक जण ग्रासले आहेत. मात्र, या काळात रोजगार गेल्यास सार्वजनिक क्षेत्रातली इंडियन ओव्हरसीज बँक मदतीला धावून येणार आहे.

ही आहे खास योजना

इंडियन ओव्हरसीज बँकेने एक खास कर्ज योजना सुरु केली असून स्वयं सहायता गटा (एमएचजी) साठी ९.४ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षा गॅटंरी घेण्यात येणार नाही. ही योजना ३० जून २०२० पर्यंत असणार आहे.

- Advertisement -

असा करावा लागणार अर्ज

या योजनेसाठी बँकेच्या शाखेमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. मात्र, जर त्या बँकेची शाखा लांब असेल तर बँकेच्या प्रतिनिधीद्वारे अर्ज करता येणार आहे. एका गटाला जास्तीत जास्त १ लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तसेच प्रत्येक सदस्याला ५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहेत. हे कर्ज सहा दिवसांत मंजूर केले जाणार आहे. विशेष म्हणजे कर्ज मिळाल्यानंतर पहिले सहा महिने हप्ते भरण्यापासून सूट देखील मिळणार आहे. तसेच सलग ३० महिन्यांमध्ये परतफेड करावी लागणार असून ३६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

यांनाच मिळणार कर्ज

कोरोनाच्या संकटासाठी ही योजना बनवण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. तसेच ज्यांचे ट्रॅक रेकोर्ड चांगले आहेत त्यांनाच हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय कमीत कमी दोनवेळा या समुहांनी एखाद्या बँकेचे कर्ज घेतलेले असायला हवे. त्याचप्रमाणे ते कर्ज वेळच्या वेळी परतफेड केलेल्यांनाच मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Rapid Test Kit: भारताने अखेर ‘चायना माल’ नाकारला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -