घरदेश-विदेशBJD महाआघाडीमध्ये नाही - पटनाईक

BJD महाआघाडीमध्ये नाही – पटनाईक

Subscribe

२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधीपक्षांनी एकत्र यायला सुरूवात केली आहे. पण, महाआघाडीला मात्र ओडिशातून मोठा धक्का बसला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधीपक्षांनी एकत्र यायला सुरूवात केली आहे. पण, महाआघाडीला मात्र ओडिशातून मोठा धक्का बसला आहे. बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बिजू जनता दल महाआघाडीमध्ये सहभागी होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिजू जनता दल महाआघाडीमध्ये सहभागी होईल असं कुणीही गृहित धरू नये असं नवीन पटनाईक यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आजा त्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी नवीन पटनाईक यांची भेट घेतली होती. पण, त्या भेटीचा काहीही उपयोग झालेला नाही.

सपा, बसपा देखील महाआघाडीमध्ये नाहीत

दरम्यान, यापूर्वी देखील सपा आणि बसपानं महाआघाडीमध्ये आम्ही सहभागी नसू असं म्हटलं आहे. त्यानंतर आता नवीन पटनाईक यांनी देखील महाआघाडीमध्ये आपण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजपला २०१९च्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पण, आता सपा, बसपा आणि बीजेडीनं यामधून माघार घेतली आहे. काहीही करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचं हा महाआघाडीचा उद्देश आहे. दरम्यान, समविचारी प्रादेशिक पक्षांना देखील याबाबत महत्त्व दिलं जात आहे. महाआघाडीकडून मात्र पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार यावर कोणताही निर्णय झालेला नाही. विजयानंतर याचा निर्णय घेतला जाईल असं महाआघाडीतील नेत्याचं म्हणणं आहे.

वाचा – शरद पवार महाआघाडीच्या तयारीत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -