देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. देशावरील कोरोना संकट गडद झाले असून कोरोनाशी लढा तीव्र झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या संकटात आता राजकीय वर्तुळात आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टुलकिट प्रकरणी गंभीर आरोप लावले आहेत. काँग्रेस टुलकिट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. भाजपच्या आरोप काँग्रेसकडून फेटाळण्यात आले असून आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे तसेच संबित पात्रांवर एफआईआर दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय या आरोपांवर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते राजीव गौडा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी म्हटले आहे की, भाजपला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी भाजप टूलकिटचा खोटा अपप्रचार करत काँग्रेसवर आरोप करत आहे. यामुळे आम्ही भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संबित पात्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहोत. देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. या संकटात लोकांना मदत करण्याचे सोडून भाजप अफवा पसरवत आहे. अशे ट्विट काँग्रेस नेते राजीव गौडा यांनी केले आहे.
BJP is propagating a fake “toolkit” on “COVID-19 mismanagement” & attributing it to AICC Research Department. We are filing an FIR for forgery against @jpnadda & @sambitswaraj
When our country is devastated by COVID, instead of providing relief, BJP shamelessly concocts forgeries— Rajeev Gowda (@rajeevgowda) May 18, 2021
संबित पात्रांचा काँग्रेसवर आरोप
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी एका टूलकिटचा उल्लेख केला आहे. या टूलकिटचा वापर करुन काँग्रेस भाजप आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणून उल्लेख करत आहे. तसेच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे सांगायचे आहे. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना प्रचार करण्यास सांगितलंय असा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.
Toolkits are not alien to the Congress and their eco-system. Infact, a substantial part of their energy goes into making them. Here is a toolkit on the Central Vista…they make one Toolkit of the other every week and when exposed, they “deny” it. #CongressToolkitExposed pic.twitter.com/fsR8VZUOov
— Sambit Patra (@sambitswaraj) May 18, 2021
दरम्यान संबित पात्रा यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी रोज सकाळी ट्विट करतात तो टूलकिटचा भाग आहे. ज्या प्रकारे मोदी सरकारला बदनाम करण्यात येत आहे. यामध्ये जाणूनबुजून कुंभ मेळ्याचा उल्लेख केला जात आहे. परंतु बकरी ईदवर त्यांनी मौन धारण केले आहे. कोरोना संकटाशी सामना करत असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात येत असून मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याचे सांगण्यात येत आहे.