Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Bjp AIADMK Tension : अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले...

Bjp AIADMK Tension : अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले…

Subscribe

Bjp AIADMK Tension : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत असतानाच आज (18 सप्टेंबर) तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि भाजपामधील तणाव उघडपणे समोर आला आहे. द्रविड पक्षाच्या एका ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपासोबत कोणतीही युती नाही आणि निवडणूक करारावर कोणताही निर्णय निवडणुकीदरम्यानच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Bjp AIADMK Tension Senior AIADMK leaders big statement about alliance with BJP)

हेही वाचा – Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधानाच्या भाषणाचे कौतुक; पण…

- Advertisement -

तामिळनाडू भाजपा अध्यक्ष के अन्नामलाई यांनी द्रविडचे ज्येष्ठ नेते सीएन अन्नादुराई यांच्यावर टीका केल्यानंतर वाद आणखी वाढला आहे. डी जयकुमार यांनी म्हटले की, एआयएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते दिवंगत मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाहीत, असे म्हणत के अन्नामलाई यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, के अन्नामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्यासह एआयएडीएमके नेत्यांबद्दल टीका केली होती. एआयएडीएमकेने भाजपाने आपल्या नेत्याला लगाम घालण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र भाजपा आणि राज्य युनिटच्या अध्यक्षांकडून आपल्या पक्षाच्या नेत्यांवर वारंवार टीका होत आहे, असा आरोप डी जयकुमार यांनी केला आहे.

हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप

युतीचा निर्णय निवडणुकीदरम्यानच होणार

- Advertisement -

भाजपा कार्यकर्त्यांना यापुढे युती हवी असली तरी के अन्नामलाई यांच्याशी एआयएडीएमकेशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांवरील टीका यापुढे सहन करू शकत नाही. जोपर्यंत भाजपासोबत युतीचा प्रश्न आहे, आता हे शक्य नाही. अण्णाद्रमुक भाजपासोबत नाही. युतीचा निर्णय निवडणुकीदरम्यानच होऊ शकतो आणि हा पक्षाचा निर्णय आहे, असेही डी जयकुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तामिळनाडुमध्ये भाजपा आणि एआयएडीएमके युती टीकणार का? हे पाहावे लागले.

- Advertisment -