घरदेश-विदेशदिल्लीत नव्या 500 शाळा काढण्याच्या आश्वासनाचे काय झाले? भाजपचा केजरीवाल सरकारला सवाल

दिल्लीत नव्या 500 शाळा काढण्याच्या आश्वासनाचे काय झाले? भाजपचा केजरीवाल सरकारला सवाल

Subscribe

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार आणि भाजपामध्ये अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केली. त्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले आहेत. भाजपाने 500 नव्या शाळांची आठवण करून देत भाजपाने हल्लाबोल कला आहे.

भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर निशाणा साधला. आम आदमी पा्र्टीने (आप) दिल्लीत 500 शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? अडीच वर्षांपूर्वीच्या सीव्हीसी रिपोर्टवर आतापर्यंत काय कारवाई केली? असे सवाल त्यांनी केले.

- Advertisement -

यापूर्वी दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे अतिशय प्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले होते. पण आता गेल्या तीन महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. पण त्यांना मंत्रीपदावरून हटविण्यात आलेले नाही, असे गौरव भटिया म्हणाले. भाजपाकडून वारंवार कठीण प्रश्न विचारला जातो. तेव्हा, विश्वातील सर्वोत्तम शिक्षणमंत्री मनीष सिसिदिया आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्येही त्यांचे नाव येते, त्यामुळेच राजकीय दृष्ट्या त्यांचा छळ केला जात आहे, असे केजरीवाल सांगतात. तेव्हा आता दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेबद्दलच चर्चा करू, असे भाटिया यांनी सांगितले.

- Advertisement -

गौरव भाटिया म्हणाले की, आम आदमी पक्षाचा जाहीरनामा पाहिला तर केजरीवाल यांनी दिल्लीत 500 नवीन शाळा बांधल्या जातील असे आश्वासन दिले होते. 500 नवीन शाळा बांधल्या नाहीत, पण अतिशय सुनियोजित पद्धतीने आधी PWD विभागाकडून अहवाल घ्या. आता ज्या शाळा आहेत त्यामध्ये जादा खोल्या बांधल्या जातील, नवीन शाळा उघडल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले की, शाळांमध्ये 2400 खोल्यांची आवश्यकता होती. परंतु ती वाढवून 7180 करण्यात आली, एका अंदाजानुसार, हा खर्च 326 कोटींनी वाढला आहे. ही निविदा रकमेच्या 53 टक्क्यांहून अधित होती, खर्च वाढल्याने 6133 वर्ग खोल्या बांधव्या लागल्या. केवळ 4027 ऑर्बिटर बांधले गेले.

गौरव भाटिया पुढे म्हणाले की, ‘न्यूयॉर्क टाईम्सच्या नावाचा जप, जनतेचा माल हेच ‘आप’चे स्वप्न आहे. हे आहेत अरविंद केजरीवाल जी. एवढेच नाही तर दिल्ली सरकारने 29 रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम तयार करण्यासाठी अनुदान घेतले होते. परंतु तपासणीदरम्यान सीव्हीसीच्या अहवालानुसार दोनच यंत्रणा आढळून आल्या.


शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -