BJP candidate list UP: भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ कुठून लढणार? जाणून घ्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे बिगुल आता वाजले आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता युपी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १०५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढणार आहेत. तर सिराथु विधानसभा मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय कार्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांच्या देखील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. प्रधान यांनी सांगितलं की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये २१ उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढणार आहेत. तर १०७ मतदारसंघातून २१ आमदारांचं तिकीट कापण्यात आलंय. याआधी सपा २९, बसपा ५३ आणि काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

प्रधान यांनी सांगितलं की, मागील पाच वर्षांतील गुंडराज आणि भ्रष्टाचारातून योगींनी संपवल्याचं म्हटलं आहे. यूपीमध्ये एअरपोर्ट आणि मेडिकल कॉलेज बनत आहे. यूपी निवडणुकीत भाजपा ३०० पेक्षा जास्त जागांवर जिंकून येईल.

यादीतील काही उमेदवारांची नावं

योगी आदित्यनाथ – गोरखपुर शहर
केशव प्रसाद मौर्य – प्रयागराज सिराथू
कौराना – श्रीमती मृगांका सिंह
थानागांव – सुरेश राणा
शामली – तजेंद्र सिंह निर्वाल
बुढाना – उमेश मलिक
चरथावल – सपना कश्यप
पूरकाजी – प्रमोद ओटवाल
मुझफ्फरनगर – कपिलदेव अग्रवाल
खतौली – विक्रम सैनी
मीरापूर – प्रशांत गुर्जर
सिवालखास – मनेंद्र पाल सिंह
सरदना – संगीत सोम
हस्तिनापूर – दिनेश खटीक
मेरठ कॅंट – अमित अग्रवाल
किठोर – सत्यवीर त्यागी
मेरठ – कमलदत शर्मा
मेरठ दक्षिण – सोमेंदर तोमर
छपरौली – सहेंद्रसिंग रमाला
बडोत – के.पी.सिंग मलिक
बागपत – योगेश धामा
लोणी – नंदकिशोर गुर्जर
मुरादनगर – अजित पाल त्यागी
साहिबााबाद – सुनील शर्मा

दरम्यान, ४०३ विधानसभा जागेतून युपीमध्ये १० फ्रेबुवारीपासून ७ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच शेवटचा टप्पा ७ मार्च रोजी होणार आहे. तर पहिल्या टप्प्याला १० फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिम भागातून युपीच्या निवडणुकीला सुरूवात होणार आहे. किसान आंदोलन आणि सपा-आरएलडी सारख्या युती पक्षांनी भाजपला आव्हान दिलंय.


हेही वाचा : बँका चालवणं स्पर्धात्मक, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया