Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपकडून फडणवीसांकडे मोठी जबाबदारी, जे पी नड्डांनी केली घोषणा

भाजपकडून फडणवीसांकडे मोठी जबाबदारी, जे पी नड्डांनी केली घोषणा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना भाजपने निवडणुकीच्या निमित्ताने एक महत्वाची अशी जबाबदारी दिली आहे. त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत यांनाही भाजपने निवडणुकांसाठीची जबाबदारी दिली आहे. आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ही जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये २०२२ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणूकांसाठी भाजप नेत्यांची नेमणूक प्रभारी तसेच सहप्रभारी म्हणून केली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना मणिपुर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांना पंजाबचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. या तिन्ही राज्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा चांगला जनसंपर्क आणि निवडणुकांचा अनुभव पाहता गोवा राज्यात त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. फडणवीस यांच्याकडे याआधीही गोव्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याकडे २००७ मध्ये विधानसभेच्या एका मतदारसंघाची जबाबदारी होती. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला यश आले होते.

गोव्यात कोणाची नेमणूक होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचा गोव्यातील कामाचा अनुभव पाहूनच पक्षाने त्यांची नेमणूक आगामी निवडणूकांसाठी केली आहे. येत्या वर्षभरात सात राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यापैकी पाच राज्यांसाठी भाजपने प्रभारी नेत्यांची नेमणूक केली आहे. सर्वात मोठ्या अशा उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणूकीची जबाबदारी ही धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सहप्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अर्जुनराम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंजदले, कॅप्टन अभिमन्यू, अन्नपुर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तर उत्तराखंडचे प्रभारी म्हणून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. पंजाब निवडणूकीसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांना नेमण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबतच हरदीर पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोणत्या राज्यात आहेत विधानसभा निवडणूका ?

- Advertisement -

गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर या राज्यात निवडणूका पार पडणार आहेत. या राज्यांमध्ये निवडणुकांसाठी तयारी आता सुरू झाली आहे. त्याचवेळी भाजपकडून याठिकाणी प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. म्हणूनच या राज्यांसाठी भाजपकडून अनेक मोठ्या राज्यांमध्ये महत्वाच्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.


 

- Advertisement -