घरताज्या घडामोडीनितीश कुमार मोदी लाटेत जिंकून आले, युती तोडल्यानंतर भाजपाचा हल्लाबोल

नितीश कुमार मोदी लाटेत जिंकून आले, युती तोडल्यानंतर भाजपाचा हल्लाबोल

Subscribe

राम जन्मभूमीची लढाई जेव्हा देशात जोरात सुरू होती, त्या काळात नितीश कुमार भाजपामध्ये आले होते, आणि नितीश कुमार आता जातीयवादाबाबत चर्चा करत आहेत.

पाटणा – जनता दल यूनायटेडच्या नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील सरकार कोसळलं. यावरून आता भाजपने नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. राम जन्मभूमीची लढाई जेव्हा देशात जोरात सुरू होती, त्या काळात नितीश कुमार भाजपामध्ये आले होते, आणि नितीश कुमार आता जातीयवादाबाबत चर्चा करत आहेत.

नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केल्यानंतरही येथील लोक नाराज होते, असं रविशंकर यांनी म्हटलं. २०१३ मध्ये नितीश कुमार मोदींविरोधात लढले. २०१४ मध्ये ते हारले. त्यानंतर नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेले. त्यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयावर पूनर्विचार का नाही केला? २०१९ मध्ये युतीमध्ये निवडणुका लढल्या. मोदींच्या नावाने तुम्ही २०१९ च्या निवडणुका जिंकल्या. दोन जागांवर तुम्हाला १६ जागा मिळाल्या. एकटे लढले असते तर दोनच जागा मिळाल्या असत्या असंही रविशंकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवत नितीश कुमारांचे 17 वर्षे धरसोडीचे राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केल्यामुळे बिहारच्या निवडणुका जिंकू शकलो. मोदींच्या प्रचारामुळे बिहारची हवा बदलत गेली. त्यामुळे एनडीएने येथे सत्ता स्थापन केली. तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही ४३ जागांपर्यंत कसे आलात? तुम्हाला ४३ जागा मिळालेल्या असातना भाजपला तुमच्यापेक्षा दुप्पट जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही पुढे काही चर्चा झाली नाही. तरीही तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यात आले. मोदींनी याबाबत घोषणा केली होती, तसंच, तुम्ही मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरही कार्यकर्ता आणि नेत्यांनीही तुमचं स्वागत केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -