घरदेश-विदेशआणि प्रचारादरम्यान अमित शाह कोसळले

आणि प्रचारादरम्यान अमित शाह कोसळले

Subscribe

मध्य प्रदेश येथे प्रचारादरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा कोसळले असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यांना जास्त दुखापत झाली नसल्याचे सांगितल्या जाते आहे. मात्र ज्या पद्धतीने ते कोसळले त्यांना गंभीर दुखापतीची शक्यता होती.

राजकारणात चढ उतार हे नेहेमीच येतात. यामध्ये अनेक नेत्यांवर विरोधकांकडून व्यंग करण्यात येते. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या सर्व घटनांवर लोकांचे बारीक लक्ष असते. यामध्ये प्रचारादरम्यान झालेल्या घटनांनाही लोक आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असतात. अशाच एका प्रचारादरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मध्यप्रदेश येथे निवडणूक प्रचारादरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह ट्रक वरून कोसळले असल्याचे व्हिडियोत दिसते. शाह कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना लगेच सावरले. घटनेनंतर जास्त दुखापत झाली नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले. मात्र या घटनेत त्यांना जास्त दुखापत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मिझोराम राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यानही अमित शाह हेलिकॉप्टर मधून खाली उतरतांना कोसळले होते. त्यामुळे अमित शहा निवडणूक प्रचारादरम्यान आपला तोल सांभळतांना अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.

amit shah mizhoram
मिझोराम येथे हेलिकॉप्टर मधून कोसळतांना

ट्विटवर कमेंटचा पाऊस

भाजपा अध्यक्ष अमित शाह कोसळ्याच्या व्हिडिओला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडिओवर विरोधकांकडून टीका होत आहेत तर लोकांकडून कमेंट केल्या जात आहे. शनिवारी प्रचारादरम्यान मध्यप्रदेश येथील अशोक नगर परिसरात आल्यावर ट्रकवरून खाली उतरताना अमित शहा कोसळले. २८ नोव्हेंबर रोजी मिझोराम राज्यात निवडणूक असल्याने अमित शहा प्रचारासाठी तेथे पोहोचले होते. या निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अमित शहा

“एअरपोर्टवर जेव्हा मी आले त्यावेळी टीव्हीवर सुरु असलेल्या कार्यक्रमात राहुल बाबा (काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी) मध्य प्रदेश येथे त्यांची सत्ता येणार असल्याचे बोलत होते. राहुल बाबाचा पक्ष मध्य प्रदेश निवडणूक जिंकेल असे स्वप्न बघत आहेत.”- भाजपा अध्यक्ष अमित शाह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -