घरदेश-विदेशPakistan Zindabad : राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान झिंदाबाद? खरं काय...

Pakistan Zindabad : राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान झिंदाबाद? खरं काय…

Subscribe

कर्नाटक : मंगळवारी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. आणि संध्याकाळी मतमोजणीही झाली. काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. निवडणुकीनंतर काँग्रेस नेते नसीर हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी “पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. परंतु, काँग्रेसने हे दावे फेटाळून लावले असून त्यांचे कार्यकर्ते फक्त हुसेन यांच्यासाठी घोषणा देत होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. एका नियतकालिकाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – Chandrakant Patil : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यापीठांमधील फी होणार माफ

- Advertisement -

काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओमधून “पाकिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

या व्हिडीओत काय?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय सचिव नसीर हुसेन यांनी कर्नाटकमधून राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे पाकिस्तानबद्दलचे वेड धक्कादायक आहे. देशाचे तुकडीत करण्याचा त्यांचा विचार आहे. ते आम्हाला परवडणारे नाही”, असे मालवीय म्हणाले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि कर्नाटकचे नेते सीटी रवी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Pankaja Munde : पुन्हा केवळ चर्चाच… मिळाली नवी जबाबदारी

कॉंग्रेसचे स्पष्टीकरण काय?

भाजपचा दावा फेटाळून लावत काँग्रेस नेते नसीर हुसेन म्हणाले की, त्यांनी ‘नसीर हुसेन झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद,’ ‘नसीर खान झिंदाबाद’ आणि ‘नसीर साब जिंदाबाद’ अशा घोषणाच ऐकल्या. “माध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले ते मी ऐकले नाही. जर मी ते ऐकले असते, तर आक्षेप घेतला असता, विधानाचा निषेध केला असता आणि त्यांच्यावर आवश्यक कारवाईची मागणी केली असती”, ते म्हणाले. यासोबतच काँग्रेसने घटनास्थळावरील मूळ व्हीडिओही सादर केला. ज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत नाहीत. त्यामुळे आता कोणता व्हीडिओ खरा आणि कोणता खोटा हे पोलीस तपासातूनच सिद्ध होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -