घरदेश-विदेशदिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर आता काॅंग्रेसची सारवासारव; म्हणाले...

दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर आता काॅंग्रेसची सारवासारव; म्हणाले…

Subscribe

भाजपने गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला आणि भारतातील मुद्यांवर बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करण्यास सांगितल्याचा आरोप केला, आता यावर काॅंग्रेसने मात्र सारवासारव केली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, देशातील राजकीय समस्या या देशांतर्गतच सोडवायल्या हव्या.

मोदी आडनावासंदर्भातील मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली असून, त्यांना लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच जर्मनीतून आलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली असे असतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आणि यानंतर भाजपने गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला आणि भारतातील मुद्यांवर बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करण्यास सांगितल्याचा आरोप केला, आता यावर काॅंग्रेसने मात्र सारवासारव केली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, देशातील राजकीय समस्या या देशांतर्गतच सोडवायल्या हव्या.

काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, भारताच्या लोकशाही प्रक्रियेला आपल्यावर होणारे आक्रमण, दडपशाहीचे राजकारण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकशाहीला निर्माण झालेल्या धोक्यांचा सामना करावा लागेल, यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष याबाबत निर्भयपणे लढतील.

- Advertisement -

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आम्ही भारतातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाची आणि त्यांचे संसदीय सदस्यत्व निलंबनाची दखल घेतली आहे. आमच्या माहितीनुसार, राहुल गांधी या निर्णयाला आव्हान देऊ शकतात, असे प्रवक्त्याने सांगितले. त्यानंतर हा निर्णय कायम राहणार की नाही आणि स्थगितीला काही आधार आहे का, हे स्पष्ट होईल. प्रवक्त्याने सांगितले की, जर्मनीला अपेक्षा आहे की न्यायालयीन स्वातंत्र्याचे निकष आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे राहुल गांधींविरुद्धच्या कारवाईला समानपणे लागू होतील.

जर्मनीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले की, राहुल गांधींना अडचणीत आणून भारतातील लोकशाहीशी तडजोड केली जात आहे, याची दखल घेतल्याबद्दल जर्मनीचे परराष्ट्र मंत्रालय आणि डॉयचे वेलेचे आंतरराष्ट्रीय संपादक रिचर्ड वॉकर यांचे आभार. त्यांच्या या ट्वीटनंतर भाजपने दिग्विजय सिंह तसेच, काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: घासलेट चोर… माकडाची कुंडली… मिटकरींच्या टीकेवर मनसेचा जोरदार पलटवार )

भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधत विरोधी पक्ष अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाला आमंत्रण देत असल्याचा आरोप केला. दिग्विजय सिंह यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परदेशी लोकांना आमंत्रित केल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -