घरदेश-विदेशपर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारले

पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारले

Subscribe

गोव्यात 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. पहिल्या यादीनुसार भाजपने आपले 34 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र या यादीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांचे नाव नसल्याने त्यांना तिकीट नाकारल्याचे म्हटले जात आहे.

गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागांसाठी येत्या १४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीममधून लढणार असून उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर मडगावमधून लढणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी पणजी विधानसभा क्षेत्रातून तिकीट मागितले होते. मात्र, पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर यांना पणजी सोडून इतर दोन जागेचा विचार करण्यासाठी सांगितले आहे. तर उत्पल पर्रिकर यांनी मात्र पणजीतूनच निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला आहे.

पर्रिकर कुटुंब आमच्या जवळचे आहेत. उत्पल पर्रिकर यांना पणजी सोडून इतर दोन जागेचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. लवकरच उर्वरित 6 नावांची घोषणा करण्यात येईल.
-देवेंद्र फडणवीस, गोव्याचे प्रभारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -