घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मिरमधील भाजपच्या सेलिब्रेशनवर ओमर अब्दुलांची नाराजी

जम्मू-काश्मिरमधील भाजपच्या सेलिब्रेशनवर ओमर अब्दुलांची नाराजी

Subscribe

अयोध्येत आज बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. तसेच जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज एक वर्ष पुर्ण होत आहे. या दोन्ही घटनांचा आनंद व्यक्त करण्यासाठी जम्मू-काश्मिरमधील भाजपचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मिठाई वाटप करत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र या सोहळ्यावर जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी नाराजी प्रकट केली आहे.

ओमर अब्दुला यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात, “भाजपचे लोक दुटप्पी आहेत. हे लोक रस्त्यावर उतरुन आनंद साजरा करु शकतात. मात्र इतरांनी एकत्र येऊन जम्मू-काश्मिरच्या हिताची चर्चा केलेली यांना चालत नाही.” ओमर अब्दुला यांच्या ट्विटवर काही लोकांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे. ट्विटरवरील ट्रोलर्स म्हणतात की, “जम्मू-काश्मिरच्या हिताची तुम्ही चर्चा करण्याचे दिवस आता संपले आहेत. तुम्ही घरीच बसून शेव खा.” तर दुसऱ्या एका ट्विटर युजरने आम्ही तुमच्या वाट्याचाही जल्लोश साजरा करत असल्याचे लिहिले होते.

- Advertisement -

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेत अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्दबातल करण्यात आले होते. तसेच जम्मू-काश्मिर आणि लडाखचे विभाजन केले होते. आता लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. या घटनेला वर्षपुर्ती होत असल्याबद्दल कालपासूनच जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. कारण अद्यापही काश्मिरमधील एक मोठा घटक केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मिरमधील स्थानिक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर केला होता. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर अनेक पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुला या नेत्यांना एक वर्षांपासून नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -