घरदेश-विदेशभाजपची देणगी २८ टक्क्यांनी वाढली; ६१४.६२६ कोटी तिजोरीत जमा

भाजपची देणगी २८ टक्क्यांनी वाढली; ६१४.६२६ कोटी तिजोरीत जमा

Subscribe

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्सने (एडीआर) मंगळवारी एक अहवाल जारी केला. या अहवालातून राजकीय पक्ष्यांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय पक्ष्यांनी त्यांना २० हजार रुपयांवरील मिळालेल्या एकूण देणगीचा तपशील दिला आहे. ही एकूण देणगी ७८०.७७ कोटी रुपयांची आहे. ७,१४१ देणग्यांच्या माध्यमातून ही देणगी मिळालेली आहे.

नवी दिल्लीः भाजपची लोकप्रियता जशी वाढत चालली आहे, तशी या पक्ष्याला मिळणारी देणगीही दिवेंसदिवस वाढत चालली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भाजपला ६१४.६२६ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. देणगी मिळालेल्यांच्या यादीत कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकवार आहे. कॉंग्रेस आणि भाजपला मिळालेल्या देणगीमध्ये मोठी तफावत आहे. गेल्या आर्थिक वर्षात कॉंग्रेसला ९५.४ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्सने (एडीआर) मंगळवारी एक अहवाल जारी केला. या अहवालातून राजकीय पक्ष्यांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय पक्ष्यांनी त्यांना २० हजार रुपयांवरील मिळालेल्या एकूण देणगीचा तपशील दिला आहे. ही एकूण देणगी ७८०.७७ कोटी रुपयांची आहे. ७,१४१ देणग्यांच्या माध्यमातून ही देणगी मिळाली आहे.

- Advertisement -

भाजपला एकूण ६१४.६२६ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ४ हजार ९५७ देणग्यांच्या माध्यमातून ही देणगी मिळाली आहे. तर कॉंग्रेसला १ हजार २५५ देणग्या मिळाल्या आहेत. त्यानुसार एकूण ९५. ४५ कोटी रुपये कॉंग्रेसच्या तिजोरीत देणगी स्वरुपात जमा झाले आहेत. राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी(सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पार्टी( सीपीआय-एम), नॅशनल पीपल्स पार्टी व ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेसला मिळालेल्या एकूण देणगीच्या तिप्पट देणगी भाजपला मिळाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे बहुजन समाज पार्टीला (बसपा) २० हजार रुपयांपेक्षी अधिक देणगी मिळाली नाही. गेली सलग १६ वर्षे २० हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी मिळाली नसल्याचा दावा बसपने केला आहे. राष्ट्रीय पक्ष्यांच्या एकूण देणगीमध्ये १८७.०२६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जवळपास ३१ टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. भाजपला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४७७.५४५ कोटी रुपये देणगी मिळाली होती. २०२१-२२ या वर्षात ६१४.६२६ कोटी रुपये देणगी भाजपला मिळाली आहे. भाजपच्या देणगीत २८.७१ टक्के वाढ झाली आहे. इतर राष्ट्रीय पक्ष्यांना भाजपला मिळालेल्या देणगीच्या जवळपासही जाता आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -