घरअर्थजगतदानशूरांकडून भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचे दान, इतर पक्षांच्या तुलनेत तिप्पट देणगी

दानशूरांकडून भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचे दान, इतर पक्षांच्या तुलनेत तिप्पट देणगी

Subscribe

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janata Party) 2021-22 या आर्थिक वर्षांत 614 कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms) च्या अहवालातून समोर आली आहे. तर, काँग्रेसला 95 कोटी रुपये देणगीस्वरुपात (Donation) मिळाले आहेत. अहवालानुसार, 2021-22 साठी राष्ट्रीय पक्षांनी (National Parties) जाहीर केलेल्या एकूण देणग्या 780.774 कोटी रुपये आहेत. २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणग्यांच्या माहितीवरून ही आकडेवारी काढण्यात आली आहे.

4,957 देणग्यांमधून एकूण 614.63 कोटी रुपये भाजपाला देणगी स्वरुपात मिळाल्या आहेत. काँग्रेसला 1,255 देणग्यांमधून 95.46 कोटी रुपये देणगीस्वरुपात मिळाले आहेत. काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआय(एम), एनपीईपी आणि एआयटीसीपेक्षाही भाजपाला मिळालेली देणगी तिप्पट आहे, असंही एडीआरने अहवालात नमूद केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोणाला घाबरताय? संभाजीनगर नामकरणावरून राऊतांचा भाजपाला सवाल

ADR नुसार, बहुजन समाज पक्षाला 2021-22 मध्ये 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या नाहीत. 2021-22 मध्ये एकूण राष्ट्रीय पक्षांच्या देणग्यांमध्ये 187.03 कोटी रुपयांची वाढ झाली, 2020-21 च्या तुलनेत 31.50 टक्के वाढ असल्याची माहिती अहवालात आहे.

- Advertisement -

भाजपच्या देणगीत 28.71% वाढ झाली असून, 2020-21 मध्ये 477.55 कोटींची देणगी भाजपाला प्राप्त झाली होती. तर, आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 41.49 टक्क्यांनी देणगी कमी मिळाली होती. काँग्रेसने आर्थिक वर्ष 2020-21 मधील 74.52 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 95.46 कोटी रुपयांची देणगी वाढवली. 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये काँग्रेसच्या देणग्यांमध्ये 46.39 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांना दिल्लीतून एकूण 395.85 कोटी रुपये, त्यानंतर महाराष्ट्रातून 105.3523 कोटी रुपये आणि गुजरातमधून 44.96 कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, कॉर्पोरेट/व्यवसाय क्षेत्रांनी राष्ट्रीय पक्षांना 625.88 कोटी रुपये (एकूण देणगीच्या 80.16 टक्के) दिले, तर व्यक्तींनी पक्षांना 153.33 कोटी रुपये (एकूण देणग्यांपैकी 19.64 टक्के) दिल्याचीही माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -