घरदेश-विदेशभाजप सरकार 'लिंच पुजारी' - कपिल सिब्बल

भाजप सरकार ‘लिंच पुजारी’ – कपिल सिब्बल

Subscribe

भाजप सरकार लिंच पुजारी असल्याची टीका करत कपिल सिब्बल यांनी ट्विटरवरून भाजपला लक्ष्य केले आहे. लिंचिंग केसमधील आरोपी जामीनावर सुटल्यानंतर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी त्यांच्या सत्कार केला. त्यावरून आता कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'बेल गाडा'ला प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आणि काँग्रेसमधील वाद आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला ‘बेल गाडी’ म्हणत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप सरकार लिंच पुजारी आहे असे म्हणत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात बेल – गाडी आणि लिंच पुजारी हा वाद आणखी तीव्र होणार आहे. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी रामगड लिंचिंग केसमधील आरोपींचा सत्कार केला. त्यावरून आज कपिल सिब्बल यांनी भाजपला लक्ष्य करत लिंच पुजारी म्हणत टीका केली आहे. जयंत सिन्हा यांनी केलेल्या सत्कारावरून यशवंत सिन्हा यांनी देखील जयंत सिन्हा यांच्यावर टीका करत मला आपल्या मुलाची लाज वाटत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले कपिल सिब्बल?

- Advertisement -

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटवरून भाजपवर निशाणा साधला आहे. लिंचिंग केसमध्ये ८ आरोपी दोषी ठरले. पण जामिनावर बाहेर येताच केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी त्यांचा सत्कार केला. हाच धागा पकडत कपिल सिब्बल यांनी भाजप म्हणजे लिंच पुजारी असल्याचे ट्विट केले. काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर आहेत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस म्हणे बेल – गाडी असल्याची टीका केली होती. त्याला आता कपिल सिब्बल यांनी लिंच – पुजारी म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -