घर देश-विदेश Karnataka Election : कर्नाटकात पुन्हा भाजपचेच सरकार, अमित शाहांचा दावा

Karnataka Election : कर्नाटकात पुन्हा भाजपचेच सरकार, अमित शाहांचा दावा

Subscribe

कर्नाटक राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत या राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

कर्नाटक : कर्नाटक राज्यात सध्या विधानसभा (Karnataka Assembly Election 2023) निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत या राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेस (Congress), भाजप (BJP) या पक्षांचे राष्ट्रीय नेते उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. भाजपची पुन्हा एकदा कर्नाटक राज्यात सत्ता आणण्यासाठी या पक्षाच्या ज्येष्ठ आणि राष्ट्रीय नेत्यांनी देखील कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले आहेत. कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा भाजपचची सत्ता येणार असा दावा देखील अमित शाह (BJP Amit Shah) यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

हेही वाचा – ‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर… ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपाला टोला

- Advertisement -

अमित शाह हे कर्नाटक निवडणुकीत प्रचाराच्या रिंगणात उतरणार याबाबत सर्वांना माहिती होती. पण या निवडणुकीसाठी एकाच दिवसाला चार रोड शो करणे, त्यानंतर तत्काळ बंगळुरू येथे जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे यामुळे अमित शाह कर्नाटकात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी अतोनात मेहनत घेत असल्याचे आणि जातीने लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपची सत्ता एका राज्यात एकदा आल्यानंतर पुन्हा त्या राज्यातील मतदारच भाजपला सत्तेत आणतात असे देखील अमित शाह यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेसकडून देखील या राज्यात निवडणुकीचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेसु पक्षाकडून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत. पण काँग्रेसकडे कोणतेही पुरावे नसताना ते आरोप करण्यात आलेले आहेत. राज्यातील काँग्रेसचे काही नेते आहेत, ज्यांच्यावर पुराव्यांसहित आरोप करण्यात आलेले होते. ज्यामुळे ते तुरूंगात सुद्धा गेले होते, असा घणाघात अमित शाह यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

तसेच यंदा कर्नाटकात भाजपच जिंकणारच नाही तर बहुमताने सत्ता स्थापन करणार. तर बहुमतापेक्षा 15 जागा अधिक भाजपला मिळतील, असा दावा सुद्धा अमित शाह यांच्याकडून करण्यात आलेला आहे. 10 मे ला कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर लगेच 13 मे ला या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. कर्नाटक राज्यात एकूण 5 करोड 21 लाख 73 हजार 579 मतदार आहेत. त्यात 100 हून अधिक वयाचे 16 हजाराहून अधिक मतदार आहेत. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे.

- Advertisment -