काली देवीबद्दल वक्तव्य करणाऱ्या महुआ मोईत्रांना अटक करा, भाजपची मागणी

काली देवीबद्दल वक्तव्य करणाऱ्या महुआ मोईत्रा यांनी वक्तव्य केले होते. यावर महुआ मोईत्रांना अटक करा, अशी मागणी भाजपने केली आहे.

Mahua Moitra

‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर आणि टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांच्या वक्तव्यावरून वाद वाढत आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्ष टीएमसीवर काली दोवीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसेच टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपने तक्रार (BJP) दाखल केली आहे. यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काय म्हणाल्या मोईत्रा –

मोईत्रा यांनी मंगळवारी India Today Conclave East 2022 मध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी कालीच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादावर म्हटले होते की, कालीची अनेक रूप आहे. माझ्यासाठी काली म्हणजे मांस आणि वाइन स्वीकारणारी देवी. मात्र, टीएमसीने या विधानापासून दूर राहून त्याचा निषेध केला.

भाजपची तक्रार –

महुआच्या या वक्तव्यावर बंगाल भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप नेते राजर्षी लाहिरी यांनी कोलकाता येथील रवींद्र सरोबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महुआ मोइत्रा यांनी एका कार्यक्रमात काली ही देवी आहे जी मांस आणि मद्य स्वीकारते. मोइत्रा यांनी मुद्दाम आमच्या धर्म आणि धार्मिक श्रद्धांबद्दल हे विधान केले आहे, असे म्हंटले आहे.

मोईत्रा यांच्या वक्तव्यामुळे राज्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते –

अशा परिस्थितीत महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीत पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. महुआ मोईत्रा यांचे विधान धर्माच्या आधारावर विविध गटांमधील शत्रुत्वाला चालना देते. अशा प्रकरणात महुआविरुद्ध 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हंटले आहे. यानंतर महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.