घरताज्या घडामोडीभाजपच्या विजयाचे रहस्य Silent Voter, वाचा पंतप्रधान मोदी काय म्हणाले

भाजपच्या विजयाचे रहस्य Silent Voter, वाचा पंतप्रधान मोदी काय म्हणाले

Subscribe

बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी धन्यवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विजयाचे रहस्य सर्वांना सांगितले. मोदी म्हणाले की, “मागच्या दोन दिवसांपासून भाजपच्या सायलेंट व्होटरची चर्चा होत आहे. भाजपचा हा सायलेंट व्होटर म्हणजे देशातील महिला वर्ग आहे. देशातील माता-भगिनींसाठी भाजपने जे काम केले आहे. त्यातून महिलावर्गाचा मोठा पाठिंबा भाजपला मिळताना दिसतोय.”

भाजपच्या बिहारमधील विजयामागे सायलेंट वोटर यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. ते खरे आहे. भाजपचा हा सायलेंट व्होटर न दिसणारा आणि न बोलणारा मतदार आहे. महिला भाजपला वारंवार मतदान करतात. बिहारमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले, त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला, असेही मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

परिवारवादी पक्षांमुळे लोकाशाही धोक्यात

यावेळी मोदींनी बिहारच्या जनतेचे आभार मानताना विरोधकांवरही जबरदस्त टीका केली. ते म्हणाले की, “आज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कौटुंबिक राजकीय पक्ष दिसत आहेत. हे परिवारवादी पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहेत. त्यामुळे देशातील युवक या परिवारवादी पक्षांना दूर ठेवत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात जुना आणि राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष परिवारवादात अडकला आहे. त्यामुळे भाजपला परिवारवादापासून दूर ठेवायचे आहे. पक्षाने प्रतिभेसोबत न्याय करुन कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला न्याय दिला पाहीजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -