घरदेश-विदेशराजस्थानमध्ये ऑपरेशन लोटस तर महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा

राजस्थानमध्ये ऑपरेशन लोटस तर महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा

Subscribe

कॉंग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गौप्यस्फोट

राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याचे विधान अशोक गेहलोत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार असून यासाठी भाजप सरकार पाडण्याचा कट रचत आहे. महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधताना अशोक गेहलोत म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप सातत्याने सरकार पडणार असल्याचे बोलत आहे. दरम्यान, आता अशोक गेहलोत यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा डाव भाजप आखत असून महाराष्ट्रातही सरकार पाडण्याच्या चर्चा आहेत, असे अशोक गेहलोत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस नेते अजय माकन हे याचे साक्षीदार आहेत. राजस्थानमधील कॉंग्रेस प्रभारी अजय माकन हे यामुळे काँग्रेस आमदारांसोबत हॉटेलमध्ये ३४ दिवस राहिले होते, असे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितले.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या आमदारांची भेट घएतली असा दावा देखील अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेसची पाच सरकार भाजपने पाडली आहेत. आता सहावे सरकार पडणार आहे, असे अमित शाह यांनी चहा-नाश्ता करताना आमदारांना सांगितले असा आरोप गेहलोत यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -