घरदेश-विदेशभाजप आयटी सेल प्रमुखांनी राहुल गांधींवर 'त्या' फोटोवरून साधला निशाणा

भाजप आयटी सेल प्रमुखांनी राहुल गांधींवर ‘त्या’ फोटोवरून साधला निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी राहुल गांधींनी स्टेशनवरील हमालांची भेट घेतली आणि हवामांसोबत राहुल गांधींनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतला. तेव्हा हमालांनी राहुल गांधींना बिल्ला दिला. तर राहुल गांधींनी काही प्रवाशांचे सामान देखील उचलले. राहुल गांधींचा हमालासोबतचा व्हिडीओ आणि प्रवाशांचे सामान उचलल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

- Advertisement -

राहुल गांधीचे हमाल आणि सामान उचलले फोटो काँग्रेसने ट्वीट केले. यात काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले की, ‘जननायक राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आपल्या हमाल सहकाऱ्यांची भेट घेतली. अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या सहकाऱ्यांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू होती. यानंतर राहुल गांधी आज हमालांशी गप्पा मारल्या. यावेळी राहुल गांधींनी सामान उचलले.”

- Advertisement -

राहुल गांधींनी प्रवाशांचे बॅग डोक्यावर घेतली आहे. राहुल गांधीच्या हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधीवर टीका केली. अमित मालवीय यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “राहुल गांधींसारखा मुर्ख माणूस हा चाके असलेली बॅग डोक्यावर घेऊन जातोय. यावरून कळते की, ते उशिरापर्यंत रेल्वे स्थानकावर गेले नाही. सध्या अनेकांकडे प्रवाशी आणि पोर्टर्सच्या सोयीसाठी एस्केलेटर किंवा रॅम्प आहेत. राहुल गांधी हे रेल्वे स्थानकावर जाऊन नाटक करत आहेत.”

हेही वाचा – अंगावर कुलीचे कपडे, डोक्यावर सुटकेस; राहुल गांधी बनले ‘हमाल’

हमालांशी मनसोक्त गप्पा

राहुल गांधी या कुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनी हमालांना दिलेला त्यांचा गणवेश घातला. डोक्यावर सुटकेसही घेतली. काही काळ रेल्वे स्टेशनवर दिसले. राहुल गांधी हा कुलींच्या वेशातील फोटो व्हायरल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -