घरताज्या घडामोडीअदानींवरून तीन सवाल विचारत सिंधियांची राहुल गांधींवर टीका

अदानींवरून तीन सवाल विचारत सिंधियांची राहुल गांधींवर टीका

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. नुकताच राहुल गांधींनी वर्ड पझलमधून अदानींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही लोकांची नावे-आडनावे जोडून ते २० हजार कोटी रुपये कोणाचे असा सवाल उपस्थित केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. नुकताच राहुल गांधींनी वर्ड पझलमधून अदानींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही लोकांची नावे-आडनावे जोडून ते २० हजार कोटी रुपये कोणाचे असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र राहुल गांधींच्या या प्रश्नाना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पलटवार केला आहे. विशेष म्हणजे सिंधिया यांनी राहुल गांधींना ३ प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक शब्द कोड्याचा फोटो पोस्ट केला. त्या फोटोमध्ये अदानी असे मोठ्या अक्षरात आहे. परंतू, त्यानंतर जी नावे त्यांनी जोडली आहेत, त्यावरून हे लोक माजी काँग्रेसी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हे लोक आता भाजपात गेले आहेत. या लोकांनी राहुल यांची साथ सोडली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया असल्याचेही अंदाज लावले जात आहेत. कारण, या एका नावात शिंदे म्हणजे Scindia हेही नाव येतं. त्यावरुन, आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मात्र, राहुल गांधींच्या या ट्विटवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘आता हे स्पष्ट झाले आहे की, तुम्ही फक्त एका ट्रोलपर्यंत मर्यादीत राहिला आहात. माझ्यावर निराधार आरोप लावणे आणि इतर मुद्द्यांवरुन लोकांचे ध्यान भटकविण्यापेक्षा माझ्या या ३ प्रश्नांची उत्तरे द्या’, असे म्हणत राहुल गांधींना तीन विचारले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधीयांचे ३ प्रश्न

- Advertisement -
  • मागासवर्गीयांचा अपमान केल्याच्या विधानाबद्दल आपण माफी का मागत नाहीत? याउलट सावरकर यांचा अपमान करता, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करता
  • ज्या न्यायलयाकडे काँग्रेसने सातत्याने बोट दाखवले, आज आपल्या स्वार्थासाठी त्यांवर दबाव का टाकत आहात?
  • तुमच्यासाठी नियम वेगळे का असावेत? तुम्ही स्वत:ला फर्स्ट क्लास व्यक्ती समजता का?

हेही वाचा  – ‘आप’ला मिळाला राष्ट्रीय दर्जा तर, तृणमूल काँग्रेससह ‘भाकप’ झाले प्रादेशिक पक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -