घरदेश-विदेशKirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार, माझा मनसुख...

Kirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार, माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न- किरीट सोमय्या

Subscribe

“माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घडवून आणला. या हल्ल्याला संजय पांडे जबाबदार”, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव असल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

“या संपूर्ण घटनेला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार”

“काल माझ्यावर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता, मी पोहचण्याआधी संध्याकाळी पोलिसांना कळवले होते, मी रात्री 9.30 वाजता येणार आहे. मात्र मी येण्याआधी 70 – 80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ल्याची व्यवस्था केली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात, दारापाशी शिवसैनिक जमले होते, येताना मला शिवीगाळ, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मी परत जाताना पोलिसांना सांगितलं की, शिवसैनिक हल्ला करणार आहेत…. यावेळी पोलिसांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि सांगितले आम्ही आहोत आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. मात्र पोलीस स्टेशनचा गेट उघडल्याबरोबर 70 – 80 गुडांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचे पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले, या संपूर्ण घटनेला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत” असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

“एफआयआरवर सही करण्यास नकार दिल्याने  डीसीपींनी धमकी दिली”

“पोलिसांच्या दारात कसे काय 70 गुंड जमू शकतात? फक्त एवढंच नव्हे मुख्यमंत्री कार्यालय, पोलीस आयुक्तांकडून सतत वांद्रे, खार पोलीस स्टेशनला फोन येत होते. असा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. वांद्रे पोलिसांनी एफआरआय नोंदवला.. याच्या इतक मॅनिप्युलेटिव्ह फेक एफआयआयआर फक्त उद्धव ठाकरे सरकारचं करू शकत. या एफआयआरमध्ये लिहिलं आहे, शिवसैनिक १०० मीटर आणि ३ किलोमीटर दूर आहेत… हे पोलीस कमिश्नर संजय पांडे यांनी नमूद केलयं. माझ्या गाडीवर एक दगड लांबून आला हे स्टेटमेंट माझ्या नावाने संजय पांडे यांनी लिहिले आहे. ही एफआयआर मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या नावाने रजिस्टर केली आहे. या फेरफार केलेल्या एफआयआरवर सही करण्यास नकार दिल्याने तिथल्या डीसीपींनी धमकी दिली की, एफआयआर ऑनलाईन गेली, तुम्ही सही नाही केली तरी हिच एफआयआर धरली जाणार.. या प्रकारची गुंडगिरी ठाकरे सरकारची माफिया पोलीस करू शकतात. ही माफियागिरी. सरकारप्रणित हल्ला आहे. पोलिसांशी हातमिळवणी झाली होती. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

“उद्धव ठाकरेंचा मला आंधळा करण्याचा प्रयत्न होता”

शिवसैनिकांनी माझ्यावर केलेला हल्ला पोलिसांच्या मदतीने झाला आहे. 70 -80 लोकं तिथे एकत्र आले कसे? बनावट एफआयआर पोलिसांनी माझ्या नावे केला. त्यावेळी मी वांद्रा पोलीस स्टेशनच्या डेप्युटी कमिश्नरला हे प्रोटेस्ट लेटर दिले की, माझा जीव घेण्याचा प्रयत्न खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह ७० -८० शिवसेनेच्या गुंडांनी केला आहे. माझ्यावर काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, चप्पल फेकण्यात आल्या. दगडफेक करण्यात आली, गाडीची काच फोडण्यात आली, माझ्यावर चेहऱ्याला दगड लागला. हा दगड जर थोडा वरती लागला असता तर माझा एक डोळा गेला असता. उद्धव ठाकरेंचा मला आंधळा करण्याचा प्रयत्न होता. या सगळ्याविरोधात मी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.


शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, काचा फोडल्या, हल्ल्यात सोमय्या जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -