घरदेश-विदेशभाजपा नेत्या, 'टिक टॉक' स्टार सोनाली फोगट यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपा नेत्या, ‘टिक टॉक’ स्टार सोनाली फोगट यांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

कुटुंबीयांकडूनच मिळाली जीवे मारण्याची धमकी

भाजपा नेत्या, ‘टिक टॉक’ स्टार सोनाली फोगट यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढेच नाही तर त्यांना मारहान देखील करण्यात आली आहे. हा आरोप स्वतः सोनाली फोगट यांनी केला असून त्यांना करण्यात आलेली मारहाण किंवा जीवे मारण्याची धमकी कोणा बाहेरच्या व्यक्तीकडून न मिळता त्यांच्या कुटुंबीयांकडूनच धमकी मिळाली आहे. अशी धमकी त्यांची बहिण आणि बहिणीच्या पतीकडून त्यांना मिळाली आहे. या प्रकरणी सोनाली फोगट यांनी फतेहाबादच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र, सध्या कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.

असा घडला प्रकार

फतेहाबाद येथे सोनाली आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी आल्या होत्या. यावेळी काही घरगुती कारणांवरून त्यांचा त्यांच्या बहिणीसोबत वाद झाला. या कौटुंबिक कारणावरुन झालेल्या वादामध्ये त्यांच्या बहिणीच्या पतीने सोनाली यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सोनाली फोगट यांनी केला आहे.

- Advertisement -

हा वाद झाल्यानंतर घरच्या घरी न मिटवता सोनाली यांनी आपल्या बहिणीच्या पती आणि बहिणीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा आरोप केल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणीदेखील केली आहे.

दरम्यान ,भाजपाच्या प्रसिद्ध नेत्या सोनाली फोगट आपल्या टिक-टॉक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सोनाली यांनी नुकतीच आदमपूर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.


जास्त जागा येऊनही सत्ताधाऱ्यांपेक्षा आम्हाला दिवाळी चांगली गेली – अजित पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -