घरताज्या घडामोडीBJP नेत्यांचा अनोखा फंडा; कोरोनाला पळविण्यासाठी गल्लोगल्ली शंख नाद आणि अंगारे धुपारे

BJP नेत्यांचा अनोखा फंडा; कोरोनाला पळविण्यासाठी गल्लोगल्ली शंख नाद आणि अंगारे धुपारे

Subscribe

गेल्या वर्षभरापासून कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप काही नेते अजब वक्तव्य आणि कृत्य करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या असा सल्ला दिला होता. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री आणि बिकानेरचे भाजप खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी पापड खाल्ल्याने शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि कोरोनावर मात करता येते, असा दावा केला होता. आता उत्तर प्रदेशमधील मेरठच्या भाजप नेते गोपाल शर्मा यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे. गल्लोगल्ली शंख नाद करत आणि अंगारे धुपारे घेऊन भाजप नेते शर्मा फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका हात गाडीवर हवनकुंड ठेवू संपूर्ण गल्लीत धुप पसरवताना दिसत आहे आणि यादरम्यान गोपाल शर्मा शंख नाद करून हनुमान चालीसा पठण करताना दिसत आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी आणि हवेचे शुद्धीकरण करण्यासाठी हे सर्व करत असल्याचे, शर्मा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गोपाल शर्मा म्हणाले की, स्वदेशी गाईचे शेणे, मूत्र, दूध, तूप याने आजार पळून जातो. त्यामुळे स्वदेश गायींच्या शेणाने हवन करून ते एका खोलगट भांडण्यात ठेवून ते हातगाडीवरून गल्लोगल्ली फिरवत आहे.

पुढे भाजप नेते शर्मा यांनी पुढे सांगितले की, त्यांनी हवनमध्ये स्वदेशी गायींच्या शेणापासून तयार केलेल्या शेणी, स्वदेशी गाईचे तूप, कापूर याचा वापर केला आहे. आंब्याच्या लाकडे जाळून हवन केले. कारण धुरामुळे हवा शुद्धीकरण होते आणि यामुळे हवेतील ऑक्सिजन वाढते आणि व्हायरस नष्ट होता, असा दावा केला आहे. पाहा भाजपच्या नेत्याचे अजब कृत्य

- Advertisement -

नया ड्रामा मेरठ से भाजपा नेता गोपाल शर्मा हवन के धुएं से कोरोना को भगाने निकले हैं।

Posted by Kuldeep Chaudhary on Tuesday, May 18, 2021

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -