जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कैलास विजयवर्गीय थोडक्यात बचावले

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कैलास विजयवर्गीय थोडक्यात बचावले आहेत.

bjp leader jp nadda kailash vijayvargiya convoy attacked in bengal
भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कैलास विजयवर्गीय बचावले

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकण्यात आले. यामध्ये गाड्यांच्या काचा फुटून दगड आत घुसले. या हल्ल्यात कैलास विजयवर्गीय थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारणाला आता हिंसक वळण आल्याचे दिसून येत आहे.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला?

२०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज ते ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दरम्यान, दक्षिण २४ परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकत हल्ला केला. यामध्ये कैलास विजयवर्गीय थोडक्यात बचावले असून सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले.

भाजपाचे नगर अध्यक्ष सुरजीत हलधर यांनी सांगितले आहे की, ‘झेंडे लावत असताना १०० हून अधिक टीएमसी कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला. आम्हाला वाईट पद्धतीने मारहाण केली आहे. मला ठार मारण्याची धमकीही दिली. यामध्ये आमचे १०-१२ कार्यकर्ते जखमी झाले आहेत’.

हे आरोप खोटे आहेत

तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे की, ‘आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही कधीही असे काम करत नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच अभिषेक बॅनर्जी यांचे पोस्टर फाडले आहे. घोष आणि विजयवर्गीय नेहमी चुकीचे वक्तव्य करत असतात. भाजपा फक्त खोटे बोलते’.


हेही वाचा – अमानुषतेचा कळस! पतीसमोरच १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार