घरदेश-विदेशमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची हत्या!

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची हत्या!

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये मॉर्निग वॉकला घरातून बाहेर पडलेल्या भाजप नेत्याची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली आहे. मनोज ठाकरे असे या भाजप नेत्याचे नाव होते.

मध्य प्रदेशमध्ये एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आली आहे. हा भाजप नेता सकाळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या बरवानी जिल्ह्यातील बलवाडी परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव मनोज ठाकरे असे आहे. मनोज ठाकरे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. यादरम्यान, पोलीस स्टेशन परिसरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांचे डोके दगडाने ठेचण्यात आले आहे. एकूणच परिस्थिती बघता पोलिसांनी मनोज ठाकरे यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. नेमकं कुठल्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

राजस्थानमध्येही घडली होती अशीच घटना

काही दिवसांपूर्वी अशीच निघृण हत्या राजस्थानमध्ये घडली होती. राजस्थानमध्येही भाजप नेत्याची निघृण हत्या करण्यात आली होती. बाईकवर येऊन दोन अज्ञात तरुणांनी भाजप नेत्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर धारधार तलावरीने निघृण हत्या केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -