घरदेश-विदेशनितीश कुमारांना समर्थक सुशासन बाबू म्हणून ओळखतात; नक्वींनी नितीशकुमारांवर साधला निशाणा

नितीश कुमारांना समर्थक सुशासन बाबू म्हणून ओळखतात; नक्वींनी नितीशकुमारांवर साधला निशाणा

Subscribe

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे, विरोधी आघाडीचे तथाकथित संयोजक ‘कुशासन बाबू’चा झगा घालून ‘सुशान बाबू’ची झोळी घेऊन फिरत आहेत अशा शब्दात नक्वींनी नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (के चंद्रशेखर राव) यांनी बिहार दौऱ्यानंतर राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि ‘भाजप-मुक्त भारत’ची हाक दिली. त्यानंतरचं नक्वी यांनी ही टीका केली आहे.

- Advertisement -

बिहारचे आपले समकक्ष नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्यासोबत पत्रकार परिषदेत दिसले. यावेळी त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या हुकूमशाही विरोधात केलेल्या क्रांतीचे स्मरण करताना भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. येथे पत्रकारांशी बोलताना नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना भ्रष्टाचाराच्या पेटीवर पापाचे टाके घालण्याची उपमा दिली.

नक्वी म्हणाले की, जेडीयूचे(जनता दल युनायटेड) नितीश कुमार यांना त्यांचे समर्थक सामान्यतः ‘सुशासन बाबू’ म्हणून ओळखतात. अमृत ​काळात मोदींना हटवण्याचे विरोधकांचे स्वप्न म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न आहे, ‘अमृत काळ’ हा प्रामाणिक आणि कष्टाळू लोकांचा उत्सव आहे, परंतु त्याचवेळी तो पापी आणि ढोंगी लोकांचा नाश करण्याची वेळ आहे.

- Advertisement -

‘अमृत काळ’ म्हणजे काय?

‘अमृत काळ’ हा शब्द भाजप सरकार अनेकदा वापरतो हे सर्वज्ञात आहे. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि या वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारने आत्ता 2047 या कालावधीला ‘अमृत काळ’ असे नाव दिले आहे. यादरम्यान देश स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करणार आहे.


भारतीय हवाई दलात मिराज, जग्वारची जागा घेणार स्वदेशी तेजस विमान, राफेलला देणार टक्कर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -