घरताज्या घडामोडी'कोंबडी चोर' VS 'घर कोंबडा'

‘कोंबडी चोर’ VS ‘घर कोंबडा’

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत कानशिलात लगावण्याच्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढ झाली आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन करत दगडफेक केली आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अशाच प्रकारे मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ‘कोंबडी चोर’ नावाने लावले होते. त्यालाच प्रत्युत्तर भाजप आमदार निलेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिले आहे.

आमदार नितेश राणे यांनी घर कोंबडा असा उल्लेख करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत त्यांनी हा बॅनर कोण काढणार असा सवाल केला आहे. नितेश राणे यांच्या या ट्वीटवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

एक नेटकरी म्हणाला की, ‘या ट्वीट खाली हसलो तर काही कारवाई होणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यांने लिहिले आहे की, ‘ह्या तुमच्या कारनामामुळे जर कोंबडा , कोंबडीचे मटण महाग झालं तर याला जबाबदार तुम्ही असला.’

- Advertisement -

दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद आणखीन पेटला आहे. राज्यातील चार ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आता संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – नारायण राणेंच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -