घरदेश-विदेशगुजरातमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; जुन्या वैमनस्याचा पोलिसांना संशय

गुजरातमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; जुन्या वैमनस्याचा पोलिसांना संशय

Subscribe

नवी दिल्ली : गुजरात वलसाड जिल्ह्यातील वापी तालुक्यामध्ये भाजपा उपाध्यक्ष शैलेश पटेल (BJP Vice President Shailesh Patel) यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश पटेल पत्नीसोबत दर सोमवारी शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. आजही ते सकाळी ७.१५ च्या सुमारास पत्नीसह मंदिरात पोहोचले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शैलेश पटेल पत्नीची वाट पाहत गाडीत बसले होते. याचवेळी एक दुचाकी अचानक त्याच्या गाडीजवळ येऊन थांबली. या दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शैलेश पटेल यांना काही समजायच्या आधीच त्यांच्यावर गोळीबार केला. पटेल यांच्यावर फायर केलेल्या चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. या घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

- Advertisement -

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पटेल यांची पत्नी 5 मिनिटांनी गाडीजवळ परतल्या असता त्यांनी गाडीच्या दारावर रक्त पाहिले. यानंतर त्यांनी गाडीचा दरवाजा उघडताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात शैलेश पटेल यांंना पाहिल्यावर त्यांनी आरडाओरड केला. यानंतर शैलेश पटेल यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वलसाड जिल्हा पोलीस व जिल्हा भाजप नेते घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या पथकाकडून आजूबाजूच्या परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या एलसीबी, एसओजीसह पथके तपास करत आहेत. वापी जिल्हा व राता तालुका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्यात आरोपी दिसत आहेत. पोलीस वापी तालुक्यातील इतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या आरोपींचा शोध आहेत. ज्यामुळे आरोपींची ओळख पटू शकेल आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

सांगलीमध्येही भाजपा नगरसेवकाची हत्या
सांगलीच्या जत तालुक्यामध्येही भाजपा नगरसेवक विजय ताड यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी विजय ताड यांच्या डोक्यात दगड घातला. जत येथील सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ताड आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवर असलेल्या शाळेत आपल्या मुलांना आणण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -