Homeदेश-विदेशMamata Banerjee : "बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी तुरुंगात जाणार, कारण...", भाजप...

Mamata Banerjee : “बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी तुरुंगात जाणार, कारण…”, भाजप नेत्याचा मोठा दावा

Subscribe

suvendu adhikari On mamata Banerjee : लोकसभेपूर्वी संदेशखाली येथील महिलांना अटक करण्याचा कट बॅनर्जी यांनी रचला होता, असा आरोप सुवेंदूर अधिकारी यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं संदेशखाली येथील महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. मात्र, भाजपचे सरकार आल्यानंतर चौकशी आयोग स्थापन केला जाईल. त्यानंतर ममता बॅनर्जी यांची रवानगी तुरूंगात होईल, असा दावा भाजपचे नेते, आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे

सुवेंदू अधिकारी मंगळवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबन येथे एका रॅलीला संबोधित करत होते. त्यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संदेशखालीच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी प्रथमच तिथे आल्या होत्या.

हेही वाचा : चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ढकलगाडी, यंदा तरी मुहूर्त लागणार का?

सुवेंदू अधिकारी म्हणाले, “ममता बॅनर्जी यांचा हेतू वाईट आहे. लोकसभेपूर्वी संदेशखाली येथील महिलांना अटक करण्याचा कट बॅनर्जी यांनी रचला होता. शाहजहान शेखसारख्या नेत्याच्या अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवला होता. त्या महिलांवर खोटे आरोप करून अटक करण्यात आली.”

“मुस्लीम व्होट बँक असल्यानं सीरहाट लोकसभेची तृणमूल काँग्रेसनं जिंकली. संदेशखाली विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचा विजयी होईल. कारण, हिंदू संघटीत आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसची दडपशाही पाहिली आहे,” असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “कराड दोषी असेल तर कारवाई होईल, पण धनंजय मुंडेंचा…”, अजितदादांच्या मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं