घरदेश-विदेशताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्यास भाजपा नेत्याचा नकार; शहाजहानचे मुमताजवर प्रेम होते तर...

ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्यास भाजपा नेत्याचा नकार; शहाजहानचे मुमताजवर प्रेम होते तर…

Subscribe

नवी दिल्ली : आसाममधील भाजप नेते आणि आमदार रूपज्योती कुर्मी (Assam BJP leader and MLA Rupjyoti Kurmi) ताजमहालवर (Taj Mahal) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या नेत्यांने ताजमहल प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. रूपज्योती कुर्मी म्हणाले की, ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक नाही. शहाजहानने आपली चौथी पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. पण जर त्याचे मुमताजवर प्रेम होते, तर मुमताजच्या मृत्यूनंतर त्याने आणखी तीन लग्न का केले, असा प्रश्न त्यांन उपस्थित केला आहे.

ताजमहल पाडून मंदिर बांधा
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकासह विविध वर्गांच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. अनेक नवीन अध्याय जोडले गेले आहेत, तर बरेच अध्याय पाठ्यपुस्तकातून काढून टाकले आहेत. पाठ्यपुस्तकातून मुघल साम्राज्यावरील अध्याय हटवण्यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान, आसाममधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार रूपज्योती कुर्मी यांनी मंगळवारी (4 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताजमहाल आणि कुतुबमिनारसारखी स्मारके पाडण्याची विनंती केली होती.
वास्तविक, मुघल 1526 मध्ये भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी ताजमहाल बांधला. शहाजहानने आपली चौथी पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधला. शाहजहानने एकूण ७ लग्न केले आहेत. त्यामुळे रुपज्योती कुर्मी यांनी पंतप्रधान मोदींकडे ताजमहल आणि कुतुबमिनार पाडण्याची विनंती करताना याठिकाणी जगातील सर्वात सुंदर मंदिर बांधण्याची विनंती केील आहे. या या नेत्याने आपला महिन्याचा पगार मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचे आश्वासनही दिले आहे.

- Advertisement -

कुर्मी मारियाणी विधानसभा मतदारसंघातून आमदार
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे एकेकाळचे कट्टर टीकाकार रुपज्योती कुर्मी यांनी जून 2021 मध्ये काँग्रेसशी संबंध तोडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर मारियाणी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मारियाणी विधानसभेतून ते पुन्हा एकदा निवडून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -