घरदेश-विदेशग्वाल्हेरनंतर भाजपने तीन नगरपालिका गमावल्या, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील पालिकेचा समावेश

ग्वाल्हेरनंतर भाजपने तीन नगरपालिका गमावल्या, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील पालिकेचा समावेश

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील महापालिका निवडणूकीत भाजपने 11 पैकी चार महापालिका गमावल्या होत्या. यानंतर भाजपला दुसरा धक्का बसला आहे. भाजपने दुसऱ्या दप्प्यात 3 नगर पालिका गमावल्या आहेत. ओबीसी आरक्षमानंतर या निवडणुका झाल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यात मुरैना, रीवा आणि कटनी या 3 नगरपालिका भाजपने गमावल्या. यात दोन ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्षांची सत्ता आली आहे. ग्वाल्हेरनंतर भाजपसाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. केंद्रीय कृषीमंद्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मतदार संघातील ही महत्वाची पालिका होती. ग्वाल्हेर ही ज्योतिरादित्य शिंदेची महापालिका होती. मुरैनामध्ये 47 वार्डांपैकी 19 वार्डांत काँग्रेस, 15 वर्डांत भाजप आणि आठ वार्डांत बसपा विजयी झाले. तीन अपक्ष तर एका जागेवर आपचा उमेदवार जिंकला.

- Advertisement -

मध्य प्रदेशमध्ये महापौरांची निवडणूक थेट जनतेतून होते. राज्यात १६ पालिकांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सात नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या सर्व पालिकांवर भाजपाची अनेक वर्षे सत्ता होती. ग्लाल्हेर, जबलपूर, छिंदवाडा, रीवा, मुरैना, कटनी आणि सिंगरौली या पालिका भाजपाने गमावल्या आहेत. तर काँग्रेसने पाच पालिका जिंकल्या.

ग्वाल्हेर का बोचणारे –

- Advertisement -

ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शहरी मतदारांवर भाजपाचा मोठा पगडा आहे, असे असले तरी देखील काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने आश्चर्य व्य़क्त केले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -