Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 2024 निवडणुकीत भाजपाची विजयाकडे वाटचाल; अमेरिकन मीडियाचे भाकीत

2024 निवडणुकीत भाजपाची विजयाकडे वाटचाल; अमेरिकन मीडियाचे भाकीत

Subscribe

नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अमेरिकन मीडियाने तोंड भरून कौतुक केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजपाला जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून संबोधित केले आहे. 2014, 2019 मध्ये बंपर विजयानंतर 2024 मध्ये भाजपा पुन्हा मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल, असे वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात लिहिले आहे. तसेच येणाऱ्या काळात भाजपा भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही जर्नलमध्ये म्हटले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून भाजप हा जगातील सर्वात महत्त्वाचा परदेशी पक्ष आहे, परंतु या पक्षाला नेहमी कमी लेखण्यात आले आहे. 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन विजयासोबत भाजपा 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. यासोबतच भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही लेखात म्हटले आहे.

- Advertisement -

भारताशिवाय अमेरिका चीनशी स्पर्धा करणे अशक्य
वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखानुसार भारताच्या मदतीशिवाय अमेरिका चीनशी स्पर्धा करू शकत नाही. भाजप नेते अरुण सिंह लेख प्रकाशित झाल्यानंतर म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत लोक जोडले जात आहेत. संपूर्ण जग मोदी आणि भाजपच्या धोरणांचे कौतुक करत आहे.

४३ वर्षात भाजपचा विस्तार आणि आकडेवारी पुढीलप्रमाणे…
1. 1981 मध्ये देशात भाजपचे केवळ 148 आमदार होते, पण आज 1296 आमदार आहेत.
2. 1984 मध्ये भाजपचे दोन खासदार होते, आज 303 खासदार आहेत.
3. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 1.89 कोटी मते मिळाली होती, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22.89 कोटी मते मिळाली होती.
4. भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपकडे 17 कोटींहून अधिक कार्यकर्ते असून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे ९.१४ कोटी कामगार आहेत.

- Advertisement -

16 वर्षातील सर्वात मोठा पक्ष बनण्यापर्यंतचा प्रवास
वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखामध्ये भाजपाचे जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून वर्णन केले आहे. भाजपाची स्थापना 6 एप्रिल 1980 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लाल-कृष्ण अडवाणी यांनी केली होती. मात्र, भाजप ही विचारधारा म्हणून १९५१ साली अस्तित्वात आली होती. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेवर भारतीय जनसंघाची स्थापना केली होती.
भाजपने 1984 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. पण भाजपने 224 जागांवर आपले उमेदवार उभे केल्यामुळे त्यांच्यालाठी हा मोठा पराभव होता. मात्र, त्यानंतर भाजपने तळागाळात आपले संघटन मजबूत करण्याचे काम केले. त्यामुळे स्थापनेच्या अवघ्या 16 वर्षात भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

- Advertisment -