घरताज्या घडामोडीदेशातील अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; लोकसभेच्या 60 जागांवर लक्ष

देशातील अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; लोकसभेच्या 60 जागांवर लक्ष

Subscribe

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरूवात केली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर भाजपाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे. यासाठी भाजपने 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 60 लोकसभा मतदारसंघावर भर दिला आहे.

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरूवात केली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर भाजपाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे. यासाठी भाजपने 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 60 लोकसभा मतदारसंघावर भर दिला आहे. या भागात अल्पसंख्याक लोकसंख्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने यासाठी विशेष योजना आखली आहे. तसेच, केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना पराभूत करण्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. (bjp master plan for minority people and scooter yatra in march)

भाजपाची एक योजना आखली आहे. त्यानुसार, पक्षाचे कार्यकर्ते निवडक 60 लोकसभा मतदारसंघातील 5,000 अल्पसंख्याक लोकांना भेटणार आहेत, जे पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे कौतुक करतात. तसेच, या लोकांच्या मदतीने समुदायापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपा मार्च-एप्रिलमध्ये स्कूटर यात्रा आणि स्नेह यात्रा काढणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर रॅलीने हा कार्यक्रम संपेल. या रॅलीत लोकसभेच्या निवडून आलेल्या 60 जागांचे लोक सहभागी होणार आहेत.

भाजपने लक्ष केंद्रीत केलेल्या लोकसभेच्या 60 जागांपैकी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 13 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमधून 5, बिहारमधून 4, केरळ आणि आसाममधून 6-6, मध्य प्रदेशमधून 3, तेलंगणा आणि हरियाणामधून 2-2 आणि महाराष्ट्र आणि लक्षद्वीपमधून 1-1 जागा आहेत. भाजपच्या यादीतील पश्चिम बंगाल मतदारसंघांमध्ये बेहरामपूर (64 टक्के अल्पसंख्याक लोकसंख्या), जंगीपूर (60 टक्के), मुर्शिदाबाद (59 टक्के) आणि जयनगर (30 टक्के) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

केरळमध्ये भाजपचे अधिक लक्ष

बिहारमधून किशनगंज (67 टक्के), कटिहार (38 टक्के), अररिया (32 टक्के) आणि पूर्णिया (30 टक्के) यांचा समावेश आहे. केरळमधील संसदीय जागा ज्यावर भाजप लक्ष केंद्रित करेल ते म्हणजे वायनाड (५७ टक्के अल्पसंख्याक), मलप्पुरम (६९ टक्के), पोन्नानी (६४ टक्के), कोझिकोड (३७ टक्के), वडाकारा (३५ टक्के) आणि कासरगोड (33 टक्के), उत्तर प्रदेशातील जागांमध्ये बिजनौर (३८.३३ टक्के), अमरोहा (३७.५ टक्के), कैराना (३८.५३ टक्के), नगीना (४२ टक्के), संभल (४६ टक्के), मुझफ्फरनगर (३७ टक्के) आणि रामपूर (४९.१४ टक्के) यांचा समावेश आहे.


हेही वाचा – भारतीय नौदलात दाखल होणार ‘आयएनएस वागीर’; कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -