Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपाकडून 'इतक्या' जणांची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता

भाजपाकडून ‘इतक्या’ जणांची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता

Subscribe

भाजपकडून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी(Election)ची जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचदरम्यान,आता भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (3 मे) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

भाजपकडून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची (Election) जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचदरम्यान,आता भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (3 मे) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास १२०० जणांची टीम होणार आहे, अशी माहिती भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (bjp mission 2024 jumbo executive team of 1200 people will be announced today)

12 ऑगस्ट 2022 रोजी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच बावनकुळेंनी सातत्याने महाराष्ट्रातील विविध भागांचे दौरे, बैठका, भेटीगाठी करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा अपेक्षित होती. मात्र अद्याप ती झाली नव्हती. अखेर भाजपकडून मिशन 2024 डोळ्यांसमोर ठेवून नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

या नव्या कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही 2024 च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल. तसेच 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करण्यात येईल. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे”.


हेही वाचा – ‘निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे…’, पुण्यात पवारसमर्थकांची बॅनरबाजी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -