Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भाजपच्या आमदाराने निवडणुकीपुर्वीच दिला राजीनामा; कॉंग्रेसमधील 'आयारामां'वर केले आरोप

भाजपच्या आमदाराने निवडणुकीपुर्वीच दिला राजीनामा; कॉंग्रेसमधील ‘आयारामां’वर केले आरोप

Subscribe

कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी भाजपचा राजीनामा देत 3 वर्षांच्या कार्यकाळावर नाराजी व्यक्त केली.

भोपाळ : पुढील काही महिन्यानंतर मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. असे असतानाच मात्र,निवडणुकीपूर्वीच भाजपच्या एका आमदाराने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांनी पक्ष सोडताना क़ॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.(BJP MLA resigns before election; Allegations made on ‘Ayaram’ in Congress)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी अखेर पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यासोबतच त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांचे समर्थक मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर आणि महेंद्र सिंह सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केले. रक्षाबंधन सण संपताच मध्य प्रदेशातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्याची वाटचाल कोरड्या दुष्काळाकडे; ऑगस्टमध्ये शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद

तीन वर्षाच्या कार्यकाळावर व्यक्त केली नाराजी

कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी भाजपचा राजीनामा देत 3 वर्षांच्या कार्यकाळावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजपच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात कोलारसमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली, पण कोणीही लक्ष दिले नाही. सोबतच वीरेंद्र रघुवंशी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : 1 बिलिअन डॉलर्स कुणाचे? राहुल गांधीचा पुन्हा एकदा अदानी आणि मोदींवर हल्ला

सिंधियामुळे रघुवंशीनी सोडली होती काँग्रेस

आमदार वीरेंद्र रघुवंशी म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये होतो पण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर नाराज असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधियाही भाजपमध्ये दाखल झाले, त्यामुळे त्यांना भाजप सोडावा लागला. रघुवंशी म्हणाले की, आपण दीड वर्षांपासून जनतेसाठी काम करत होतो आणि विकासासाठी प्रयत्न करत होतो, मात्र सिंधिया समर्थक मंत्री त्यांच्या विकासाच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. त्याच्यावर खोटा एफआयआर दाखल करण्याचाही प्रयत्न झाला. यासर्व कारणांमुळे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे असे रघुवंशी म्हणाले.

- Advertisment -