घरदेश-विदेशVideo: जेएनयूला मोदींचे नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

Video: जेएनयूला मोदींचे नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

Subscribe

'जेएनयूचे नाव बदलून एमएनयू ठेवा. मोदीजींच्याही नावाने काहीतरी असायला हवे', असे खासदार हंस राज हंस म्हणाले आहेत.

दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे नाव बदलून नरेंद्र मोदी विद्यापीठ ठेवण्यात यावे, असे वक्तव्य दिल्लीतील भाजप खासदार हंस राज हंस यांनी केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी सेना या विद्यार्थी सेनेने शनिवारी ‘एक शाम शहिदों के नाम’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना हंस राज हंस यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबच व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये ते जेएनयूचे नाव आता एमएनयू करण्यात यावे, असे स्पष्टपणे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रेषकही असायला लागले. त्याचबरोबर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कामांचे कौतुक केले. याशिवाय काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केलेला विधेयकही योग्य असल्याचे ते म्हणाले.

नेमके काय म्हणाले हंस राज हंस?

एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘काश्मीर आता खऱ्या अर्थाने जन्नत होणार आहे. कलम ३७७ च्या मुद्द्याचे सर्वांनी समर्थन केले आहे. आता काश्मीरमध्ये सर्व सुरळीत व्हावे. काश्मीरात कुठलाही हिंसाचार होऊ नये. जवान इकडचा मेला काय तिकडचा मेला काय, मात्र जातो तर एका आईचा मुलगाच ना! जवान शहिद झाल्यानंतर तुम्हा त्याला परमवीर चक्र द्या किंवा धर्मवीर चक्र द्या, मात्र एका आईचा मुलगा परत कधीच येणार नाही. त्यामुळे आता पुन्हा तिकडे हिंसाचार घडणार नाही, अशी प्रार्थना करुया. आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आहेत. ते आतापर्यंत आम्हाला भोगावे लागत आहे. जेएनयूचा अर्थ काय? जवाहरला नेहरु. त्यांच्यामुळे काहीतरी घडले होते. ऐकायला थोडे विचित्र वाटेल. परंतु, तरीही मी म्हणतो जेएनयूचे नाव बदलून एमएनयू ठेवा. मोदीजींच्याही नावने काहीतरी असायला हवे ना?’ असे हंस राज म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया पूरक – विनोद तावडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -