Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मला ३ वेळा बिहारी गुंडा म्हणून संबोधले, भाजप खासदाराचा महुआ मोइन्ना यांच्यावर...

मला ३ वेळा बिहारी गुंडा म्हणून संबोधले, भाजप खासदाराचा महुआ मोइन्ना यांच्यावर आरोप

माझ्या १३ वर्षांच्या संसदीय कार्यकाळात पहिल्यांदा मला शिवीगाळ करण्यात आली आहे - निशीकांत दुबे

Related Story

- Advertisement -

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइन्ना यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. खासदार दुबे यांनी म्हटलं आहे की, आयटी विषयावर बैठक सुरु असताना मोइन्ना यांनी तीन वेळा आपल्याला बिहारी गुंडा म्हणून संबोधले आहे. दुबेंनी याला हिंदी भाषी लोकांप्रति तृणमूल काँग्रेसचा द्वेष असल्याचा आरोप केला आहे. आयटी प्रकरणावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकित महुआ मोइन्ना आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यामध्ये वाद झाला यामध्ये महुआ मोइन्ना यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.

झारखंडमधील गोड्डा चे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महुआ मोइन्ना यांच्याबाबत तक्रार करणारं ट्विट केलं आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, लोकसभा अध्यक्ष, माझ्या १३ वर्षांच्या संसदीय कार्यकाळात पहिल्यांदा मला शिवीगाळ करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइन्ना यांच्यासोबत आयटी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान महुआ यांनी मला ३ वेळा बिहारी गुंडा म्हटलं आहे. ओम बिरला आणि शशि थरुर यांनी संसदीय परंपरेला संपवण्याचा ठेका घेतला आहे. असे ट्विट खासदार निशिकांत दुबे यांनी केलं आहे.

- Advertisement -

खासदार निशिकांत दुबे यांनी ट्विट करुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तृणमूल काँग्रेसने बिहारी गुंडा शब्दाचा प्रयोग करुन समस्त बिहार आणि संपुर्ण हिंदी भाषी लोकांना शिवी दिली आहे. ममता बॅनर्जी तुमच्या खासदार महुआ मोइन्ना यांनी उत्तर भारतीय आणि खासकरुन हिंदी भाषी लोकांविरोधात असलेला द्वेष समोर आणला असल्याचेही निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -