घरदेश-विदेशभाजपने पीयुष गोयल यांना दिली मोठी जबाबदारी; राज्यसभेत सभागृहनेतेपदी नियुक्ती

भाजपने पीयुष गोयल यांना दिली मोठी जबाबदारी; राज्यसभेत सभागृहनेतेपदी नियुक्ती

Subscribe

भाजपने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने गोयल यांना राज्यसभेवर सभागृह नेते म्हणून नेमणूक केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. १९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात, पीयुष गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयासह वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते थावरचंद गेहलोत हे राज्यसभेतील भाजपचे सभागृहनेते होते. मात्र, थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या राज्यपालपदी केल्याने जागा रिकामी होती. त्याजागी आता पीयुष गोयल यांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या १९ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पीयुष गोयल हे २०१० पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयासह वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यााधी त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय होतं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -