घरताज्या घडामोडीसाक्षी महाराज म्हणतात, 'मला पाकिस्तानकडून धमकी'!

साक्षी महाराज म्हणतात, ‘मला पाकिस्तानकडून धमकी’!

Subscribe

भाजपचे मध्य प्रदेशातील खासदार साक्षी महाराज यांनी आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ‘मला पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी येत आहे, बॉम्ब ब्लास्टमध्ये मला उडवून देण्याची धमकी दिली जात आहे’, अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आपल्याला दोन फोन कॉल आल्याचं देखील साक्षी महाराज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर साक्षी महाराज यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या घराबाहेर २४ तास पोलीस सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि टोकाच्या मुस्लीम विरोधामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा आता मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, पोलीस कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसून त्यानी लागलीच साक्षी महाराज यांना सुरक्षा पुरवली आहे. साक्षी महाराज यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, ‘मला दोन वेळा फोनवरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने काश्मीर लवकरच पाकिस्तानचा हिस्सा असेल असं म्हटलं आहे. शिवाय पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल देखील धमकी देणाऱ्या व्यक्तीने आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे’, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, साक्षी महाराज यांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जात असून त्यांच्या घराजवळ आणि त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी पोलीस देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशच्या सदर कोतवाली पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र मिश्रा यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -