घरदेश-विदेशराहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदाराची जीभ घसरली; म्हणाले, विदेशी महिलेच्या पोटी...

राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदाराची जीभ घसरली; म्हणाले, विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेले…

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदार संजय जैस्वाल यांनी वैयक्तिक टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती कधीही देशभक्त असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मोदी आडनाव’बाबत राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी हे विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीचका केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संजय जैस्वाल म्हणाले की, परदेशी स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती कधीही देशभक्त होऊ शकत नाही. 2000 वर्षांपूर्वी चाणक्यानेही हे सांगितले होते, असा दावाही त्यांनी केला आहे. जयस्वाल म्हणाले की, राहुल गांधी यांनी परदेशात देशाचा अपमान केला आहे. त्यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाहीवर केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात जयस्वाल यांनी ही माहिती दिली. संजय जयस्वाल म्हणाले की, राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील नाराजीचे कारण ते स्वत:ला राजकुमार समजतात. पंतप्रधान गेल्या सलग दोन टर्म बहुमताच्या सरकारमध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींनी माफी मागितली नाही ते योग्यच, सावरकर वादात तुषार गांधींची उडी

प्रज्ञासिंह ठाकूर यांचेही असेच विधान
राहुल गांधी यांना भारतात राजकारण करण्याची परवानगी देऊ नये, असे ठाकूर म्हणाल्या होत्या. राहुल यांना भारताबाहेर हाकलले पाहिजे, कारण राहुल गांधी भारताचे नाहीत यावर मतावर मी सहमत आहे. 11 मार्च रोजी ठाकूर म्हणाल्या की, राहुल गांधी भारताचे नाही. परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेले मूल कधीही देशभक्त होऊ शकत नाही, असे चाणक्य म्हणाले होते आणि राहुल गांधी यांनी हे सत्य सिद्ध केले आहे.

- Advertisement -

मोदी आडनावावरून भाजपाचा राहुल यांच्यावर हल्ला
‘मोदी आडनावा’वरील वक्तव्यावर भाजपाने राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर भाजपाने निदर्शने केली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींवर इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) अपमान केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -