उद्धव ठाकरे यांच्या सुरात भाजप नेत्याचा सूर; त्यानेही केली ‘तीच’ मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची या पदी नियुक्ती झाली आहे. मात्र हे संविधानिक पद आहे. त्यामुळे त्या जागी निवड प्रक्रियेद्वारेच निवड करणे आवश्यक आहे. परिणामी सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त करुन त्या जागी नव्याने निवड करण्यात याव्यात अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. या मागणीला भाजप खासदार स्वामी यांनी ट्विट करून पाठिंबा दिला आहे.

मुंबईः  केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्वव ठाकरे यांनी केली आहे. या मागणीला भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. खासदार स्वामी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची या पदी नियुक्ती झाली आहे. मात्र हे संविधानिक पद आहे. त्यामुळे त्या जागी निवड प्रक्रियेद्वारेच निवड करणे आवश्यक आहे. परिणामी सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त करुन त्या जागी नव्याने निवड करण्यात याव्यात अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. या मागणीवर राजकीय चर्चा सुरु झाली. मात्र या मागणीला भाजप खासदार स्वामी यांनी ट्विट करून पाठिंबा दिला आहे. कुमार हे वित्त मंत्रालयात कर्तव्यावर होते. त्यांची तेथील कारकिर्द संशयास्पद आहे. त्यामुळे उद्वव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे, असे खासदार स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपशी फारकत घेऊन शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी घरोबा केला. महाविकास आघाडी स्थापन करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपने खेळी करत शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे यांना हाताशी घेऊन भाजप सत्तेत आले. शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात होता असा आरोप होत आहे. आता तर उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांना उत्तर मिळते. असे असताना उद्धव ठाकरे यांच्या मागणीला भाजप खासदाराने पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

निवडणूक आयुक्त्यांच्या नियुक्तीबाबत प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. आपल्याकडे न्यायाधीश निवडीसाठी कॉलेजियम आहे. असे असताना निवडणूक आयुक्तांची निवड न होता थेट नियुक्ती झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.