घरदेश-विदेशभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र वरचढ मनेका-वरूण आऊट, चित्रा वाघ इन

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र वरचढ मनेका-वरूण आऊट, चित्रा वाघ इन

Subscribe

गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेली भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची अखेर घोषणा झाली.या कार्यकारिणीत महाराष्ट्राचा वरचष्मा असून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडणार्‍या राज्यातील नेत्यांना कार्यकारिणीत विशेष स्थान मिळाले आहे. जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रथमच ही फेररचना केली असून तब्बल 80 जणांची वर्णी या नव्या कार्यकारिणीत लागली आहे. या कार्यकारिणीतून माजी मंत्री मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांना डच्चू मिळाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करणार्‍या चित्रा वाघ यांनाही कार्यकारिणीत स्थान दिले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 80 सदस्य तर 50 विशेष निमंत्रित आहेत. तसेच कार्यकारिणीत 179 पदाधिकारी आहेत. यात मुख्यमंत्री आणि पक्ष प्रभारींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून ज्येेष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल या कॅबिनेट मंत्र्यांना स्थान आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन वर्षापूर्वी भाजपत आलेल्या चित्रा वाघ यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुनील देवधर यांनी आपले स्थान शाबूत ठेवले आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नसल्याने भाजपत चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

याशिवाय विनय सहस्त्रबुध्दे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचे कार्यकारिणीतील स्थान कायम आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, लड्डाराम नागवानी यांना विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून 26 जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या हीना गावित या एकमेव नेत्या आहेत. जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जुन्या कार्यकारिणीत काही बदल झाले होते. ते बदल फार मोठे नव्हते. आता नड्डांच्या नेतृत्वातली ही पहिली कार्यकारिणी म्हणता येईल. भाजपच्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक 7 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -