Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश बंगालमध्ये BJP ला मोठा धक्का! मुकुल रॉय यांची त्यांच्या मुलासह TMC मध्ये...

बंगालमध्ये BJP ला मोठा धक्का! मुकुल रॉय यांची त्यांच्या मुलासह TMC मध्ये घरवापसी

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे मोठे नेते मुकुल रॉय आपला मुलगा शुभ्रांशु यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसमध्ये परतले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी टीएमसीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. मुकुल रॉय देखील त्यांच्यासह उपस्थित होते. ममता म्हणाल्या की, भाजपमध्ये बरेच शोषण होत आहे. तिथे राहणे लोकांना अवघड जात आहे. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष नाही.

- Advertisement -

यापूर्वी बुधवारी टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय यांच्या पार्टीत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. यावेळी त्यांनी मुकुल रॉय यांचे कौतुक करत असे म्हटले की, त्यांनी टीएमसी पक्ष सोडला असला तरी त्यांनी कधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध उघडपणे कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा कोणताही आरोप केला नाही. सौगत रॉय यांच्या या वक्तव्यानंतर या शक्यतांना अधिक बळ मिळालं असून, त्यात मुकुल रॉय भाजपा सोडून टीएमसीमध्ये जात असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुल रॉय केवळ ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये परत येऊ शकतात. टीएमसीमध्ये मुकुल रॉय यांची घरवापसी म्हणजे भाजपाला धक्कादायक ठरणार असून हा निर्णय बंगालमधील त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

- Advertisement -

मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या अनेक नेत्यांचा तोडण्याचा त्यांचा हात असल्याचे म्हटले जात होते. पण आता त्यांचे पक्षातून बाहेर पडणे हा भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे. सध्या याविषयी कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुकुल रॉय दुपारी तीन वाजता टीएमसीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. या दरम्यान, सीएम ममता बॅनर्जी स्वत: हजर असतील. पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल अनुकूल नसल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. दुसरीकडे, टीएमसीचा असा दावा आहे की, भाजपचे ३५ हून अधिक नेते संपर्कात आहेत आणि त्यांना TMC मध्ये पुन्हा सहभागी व्हायचे आहे.

 

- Advertisement -