घरAssembly Battle 2022Nitin Gadkari : लवकरच हवेत बस उडताना दिसणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची...

Nitin Gadkari : लवकरच हवेत बस उडताना दिसणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यामध्ये अनेक गोष्टी करणार असल्याचं आश्वासन हे नेत्यांकडून करण्यात आलंय. प्रयागराजच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, अशा प्रकारचं आश्वासन नितीन गडकरींनी जनतेला दिलं. एवढंच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली होती. तसेच येथील जनतेला आश्वासनं देखील देण्यात आली.

त्रिवेणी संगमावर उतरण्याची इच्छा

प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे. ही इच्छाही पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरींनी म्हटले आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचं नशीब बदलण्यासाठी भाजपाचं सरकार गरजेचं

राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता. त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाणार आहे. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रूपये पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर जाणार असल्याचा दावा गडकरींनी केलाय. उत्तर प्रदेशचं नशीब बदलण्यासाठी भाजपाचं सरकार गरजेचं असल्याचं देखील गडकरी म्हणाले.

- Advertisement -

श्री राम विमानतळाच्या रनवे बांधकामाला सुरूवात

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राम विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. विशाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमधील बंगळुरूचे कर्मचारी आणि श्रमिक रनवेच्या बांधकामासाठी साफ-सफाई करण्यास गुंतले आहेत. या बांधकामांत १० हून अधिक जेसीबी उपलब्ध आहेत. विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रकल्पाचे प्रभारी राजीव कुलश्रेष्ठ यांच्यासह चार महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा :Kirit Somaiya : भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्यामुळे माझ्यावर गुन्हा, सोमय्यांची ट्विट करून माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -