Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Tamil Nadu Election 2021: निवडणूक कॅम्पेन व्हिडिओतच भाजपने वापरला काँग्रेस खासदाराच्या पत्नीचा...

Tamil Nadu Election 2021: निवडणूक कॅम्पेन व्हिडिओतच भाजपने वापरला काँग्रेस खासदाराच्या पत्नीचा फोटो!

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाचही राज्यात दिसत आहे. यंदा भाजप पक्षाने अण्णाद्रमुकबरोबर युती करून यावेळी निवडणुकीत भाजप आपले नशीब आजमावणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत, तामिळनाडूमधील प्रचारामुळे भाजप चांगलेच अस्वस्थ झाले असून त्यांची चांगलीच फजिती उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर, भाजपाच्या तामिळनाडू युनिटने ट्विटरवर निवडणूक प्रचाराशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली महिला कलाकार कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम आहे. हे लक्षात आल्यानंतर भाजपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ डिलीट केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील काँग्रेसकडून असे ट्विट करण्यात आले की, भाजपाने त्यांच्या परवानगीशिवाय श्रीनिधींचा फोटो वापरला. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, भाजपाकडे स्वतःचे कोणतेही ध्येय नाही. तर कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीही ट्विटरवर ही माहिती शेअर केली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम एक कलाकार असून ते वैद्यकीय व्यावसायिक देखील आहेत.

- Advertisement -

आपलं ध्येय आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी भाजपने निवडणूक प्रचाराचा एक व्हिडिओ काढला होता. या व्हिडिओमध्ये, जेव्हा तामिळनाडू संस्कृतीचा उल्लेख करण्यात आला तेव्हा श्रीनिधी चिदंबरम यांना भरतनाट्यम सादर करताना दाखवण्यात आले होते. इतकेच नाही तर ज्या गाण्याचा विशिष्ट भाग वापरला गेला होता, तो द्रमुकचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी त्याचे लिखाण केले होते. अशा परिस्थितीत हा प्रचाराचा व्हिडिओ भाजपला सर्वच बाजूने कोंडीत अडकवत असल्याने भाजपाची पूर्ती फजिती होत असल्याचे दिसत आहे. भाजपच्या या प्रचार मोहिमेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून भाजपाला नेटकरी चांगलेच ट्रोल करताना दिसताय. त्यानंतर भाजपनेच हा व्हिडिओ त्वरीत ट्विटरवरून डिलीट केला असल्याचे दिसतेय.


Google Map सांगणार Eco-Friendly रस्ते! वाचा सविस्तर

- Advertisement -